कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला

सचिन बिद्री: उस्मानाबाद

उमरगा तालुक्यातील साखर कारखान्यातील कामगार कै.यादव बॅरिस्टर मुनी खलाशी यांचा २४ नोव्हेंबर २०२१ रोजी रेल्वेतून जळगावकडे प्रवास करत असताना अपघाती मृत्यू झाला होता.तालुक्यातील मुरूम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांच्या हस्ते दहा लाख रुपयाच्या विम्याच्या धनादेशाचे कै. यादव यांच्या नातेवाईक नगीना शिवाजी यादव यांच्याकडे गुरुवारी (दि. २८) कारखान्याच्या सभागृहात देण्यात आला.
कारखान्याने आजवर कर्मचारी कामगार यांच्याप्रती व त्यांच्या कुटुंबीयाबद्दल नेहमीच सहानुभूतीचे धोरण ठेवून वेळोवेळी यापूर्वीदेखील सढळ हाताने मदत केली असल्याची भावना चेअरमन बसवराज पाटील यांनी व्यक्त केली. कारखान्यातील सर्व कर्मचारी व कामगार यांचा दहा लाखाचा अपघाती विमा कारखान्याच्या वतीने न्यू इंडिया इन्शरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडून उतरविण्यात येत असतो. सदर मयत कामगार यांच्या कुटुंबीयास कारखान्यातर्फे मदत म्हणून रक्कम ४ लाख २४ हजार ४७६ व अंशदानाची रक्कम ९५ हजार ८११ असे एकूण ५
लाख २० हजार २८७ यापूर्वीच देण्यात आली आहे. तसेच मयत कामगाराचे वारसास दरमहा रुपये ३००० हजार प्रमाणे फॅमिली पेन्शन लवकरच सुरू होणार आहे. याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.बी.अथणी,प्रकाश आष्टे, कारखान्याचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *