देवरी पोलीस उपमुख्यालयात होते कार्यरत…
गोंदिया : देवरी उप-मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस हवालदार महेश भुरे यानीं देवरी येथे राहत असलेल्या घराच्या वराड्यांत स्वत:लाच गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
पोलिस हवालदार महेश भुरे हे २०२० पासुन गंभिर आजाराने ग्रस्त होते. आजाराच्या सततच्या वेदना त्यानां असहय्य होत असल्याने. त्यानीं काल रात्री ११.३० वाजता दरम्यान देवरी येथे राहत असलेल्या घरातील वरांड्यात स्वतालाच फासी लावत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याचां अंतीम संस्कार त्यांचे राहते गाव साकोली येथील मोक्षधामावर आज साय. ४.०० वाजता होनार आहे. सदर घटनेची नोदं देवरी पोलिस्टेसनला करन्यात आली असून, तपास पोलिस हवालदार गायधने करीत आहेत.