अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, अपर पोलिस अधिक्षक असोक बनकर व उप.प्रा.परिवहन अधिकारी राजवर्धन करपे गोंदिया यांचे विद्यार्थानां प्रमुख मार्गदर्शन…
गोंदिया : जिल्ह्याच्या देवरी तालुका युवा मराठी पत्रकार संघ सलग्न हेल्पीगं बॉईज ग्रुप देवरी यांच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन 1 सप्टेबंर 2022 येत्या गुरूवारी करण्यात आले आहे. देवरी शहरातील स्थानिक आफताब मंगल कार्यालयात आयोजित या मार्गदर्शन शिबीराचे उद्घाटन व प्रमुख मार्गदर्शन म्हनुन अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, अपर पोलिस अधिक्षक असोक बनकर व उप.प्रा. परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांचे हस्ते सकाळी 11. 30 वाजता होणार आहे.
या शिबीराला प्रमुख उपस्थिती म्हणून देवरीचे तहसीलदार अनिल पवार, मुख्याधिकारी अजय पाटनकर, ठानेदार रेवंचद सिंगनजुडे, चिचगड पोलिस्टेनचे ठानेदार अजय भुसारी, देवरी राज्य उ.शु.विभागाचे निरीक्षक तुषार लबाळे, तालुका वैद्य. अधिकारी ललीत कुकडे, वन परिक्षेत्राधिकारी सचिन धात्रक, उप कार्य.अभि.विद्युत विभाग सरोज परिहार, वन परिक्षेत्राधिकारी बंडु चिडे, क्रुषी अधिकारी घनश्याम तोडसाम, देवरी भुमी अभिलेख अधिक्षक निलकंठ कावळे, यु.म.पत्रकार संघाचे कायदात्मक सल्हागार अँ. सचिन बावरीया, पत्रकार संघाचे मार्गदर्शक प्रितपालसींग भाटीया व मिथुन बंग उपस्थित राहणार आहेत. या शिबीरात भाग घेणाऱ्या शिबीरार्थींना स्पर्धा परिक्षा चालु-घडामोडीचे पुस्तकही वाटप करन्यात येनार आहे. तरी या शिबीराचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थानीं, युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवा मराठी पत्रकार संघ देवरी तालुका व हेल्पीगं बॉईज तर्फे करन्यात आले आहे. माहीती करीता 8855086056, या क्रमांकावर संपर्क करण्याचेही आयोजकानीं कळविले आहे.