पुणे : बारामती शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती येथे कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस हवालदार सौ.अमृता प्रवीण भोईटे यांना निर्भया पथकातील विशेष कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सौ.अमृता प्रवीण भोईटे या बारामती, दौंड, इंदापूर तालुक्यामध्ये सतत निर्भया पथकाचे कार्य व महिला व मुलींमध्ये सुरक्षिततिची भावना निर्माण होण्यासाठी कार्यशील असतात. त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन शाळा, कॉलेज ,कंपनीतील महिला, विद्यार्थिनी यांना प्रबोधनात्मक व्याख्याने देऊन त्यांच्या मनामध्ये असणारी असुरक्षिततेची भावना दूर होण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत,त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीची दखल पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी घेतली व त्यांना आज दिनांक २७ ऑगस्ट रोजी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आज पर्यंत त्यांच्या या बेधडक कार्यपद्धतीची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.यामध्ये पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार लोहिया, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी देखील विशेष पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देखील सन्मानित केले आहे. त्याचबरोबर अनेक सामाजिक संघटना, शाळा, कॉलेज यांनी देखील त्यांच्या या कामगिरीबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
बारामती विभागांतर्गत एकूण सात पोलीस स्टेशन आहेत .त्यामध्ये बारामती शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, माळेगाव, इंदापूर, भिगवण, वालचंदनगर, अशा सात पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जाऊन सौ अमृता प्रवीण भोईटे यांनी निर्भया पथक म्हणजे काय, त्याचे कार्य, बारामती विभागात कसे चालते, तक्रार कोठे व कशी द्यावी, निर्भया पेटी, निर्भया सखी, मुलींची समाजामध्ये होणारी छेडछाड ते थांबवण्यासाठी कसे प्रयत्न करावेत, चांगला स्पर्श वाईट स्पर्श याविषयी छोट्या मुलांमध्ये माहिती देऊन मोठ्या प्रमाणावर समाज प्रबोधन व जनजागृतीचे काम केले आहे.
त्याचबरोबर डायल 112,निर्भया पथक, स्थानीक पोलीस स्टेशन यांची जास्तीत जास्त मदत घेऊन आनंदी व सुरक्षित जीवन जगावे, पोलीस सदैव आपल्या पाठीशी असून गरज भासल्यास पोलिसांची मदत घ्यावी, व त्यामध्ये महिलांविषयी कायदे, स्वसंरक्षण, पोक्सो कायदा, कुटुंबातील वातावरण, पालकांचे व पाल्यांचे जबाबदाऱ्या, तणाव मुक्त जीवन कसे जगावे, व्यसनाधीनता, पोलिसांविषयीची गैरसमज, अशा वेगवेगळ्या विषयांवर शाळा कॉलेज जिल्हा परिषद शाळा यांची वेळोवेळी भेट घेऊन तेथे मार्गदर्शनात्मक कार्यक्रम आयोजित करून सर्वसामान्य जनता व पोलीस यामधील दरी कमी करण्याचे काम केले आहे पोलीस काका पोलीस दीदी ही योजना प्रभावीपणे राबवून मुलींना व महिलांना मोठ्या प्रमाणावर धीर व आधार देण्याची काम केले आहे. आशा या नेत्रदीपक कामगिरीमुळेच सौ अमृता प्रवीण भोईटे यांना पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे त्यांच्यावर आणखी जबाबदारी वाढली आहे हे निश्चितच.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे