गडचिरोल्ली : अहेरी तालुक्यातील मौजा – आरेंदा येथे सण २००५ पुर्वी अतिक्रमण केलेले शेतकऱ्यांना, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सौ. भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते वैयक्तीक वन हक्क दाव्यांचे अर्जांची वाटप अतिक्रमण शेतकऱ्यांना करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सौ. भाग्यश्री ताई आत्राम यांनी उपस्थीत अतिक्रमण शेतकऱ्यांना मार्गदर्शनात म्हणाले की, आमदार श्री धर्मराव बाब आत्राम साहेब यांच्या प्रयत्नाने अतिक्रमण जमिनीची मोजणी ला प्रत्येक्षात सुरु झालेली आहे, म्हणून आता सण २००५ पुर्वी अतिक्रमण केलेले सर्व शेतकऱ्यांनी ना चुकता वैयक्तीक वन हक्क दाव्याचे अर्ज भरावे. यानंतर तुम्हाला पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळेल याची काही गॅरंटी नाही. असे म्हणाले तसेच वैयक्तीक वन हक्क दाव्याचे अर्ज कसा भरायचे हे सुध्दा शेतकऱ्यांना समजावून संगण्यात आला. यावेळी अर्जांची वाटप करतांना मौजा – आरेंदा, पेरमीली, कोरेल्ली बु, कचलेर, कोरेल्ली खुर्द, चौडामपल्ली, ताडगुडा, कोरेपल्ली, मिरकल, गोपनार इत्यादी गावातील अतिक्रमण शेतकरी आले होते.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधान सभा अध्यक्ष श्री लक्ष्मण येररावार, येरमनारचे माजी सरपंच श्री बालाजी गावडे, श्री निमगडे साहेब ( ग्राम सेवक आरेंदा ), श्री फिरोज मडावी साहेब -( तलाठी चौडामपल्ली ), श्री रवि मेश्राम साहेब ( तलाठी पेरमीली ), श्री कोत्ता आत्राम, श्री महारू गावडे, श्री राकेश महा, श्री देवाजी सडमेक, श्री सुरेश पेंदाम, श्री मंगेश आत्राम, श्री शंकर चांदेकर, श्री चंदू आत्राम, श्री ईरपा तलांडी, श्री कन्ना वेलादी, श्री दामा गावडे, श्री नामदेव दहगावकर, श्री रामजी आत्राम ( कोतवाल ), श्री दिपक कुळमेथे ( कोतवाल ), श्री पोच्या दुर्गे, श्री नागेश आजारे, सौ.देवे आत्राम यांच्या सह अतिक्रण शेतकरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *