गडचिरोली :अहेरी येथील जय पेरसापेन नगरातील युवा शक्ती गणेश मंडळात इंदाराम येथील गुरु माऊली भजन मंडळाचे वतीने भजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. या प्रसंगी भजन कार्यक्रमाचे उदघाटन प्रदेश सदस्य तथा कार्यकारी अध्यक्ष संदीप भाऊ कोरेत यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आले.
युवा शक्ती गणेश मंडळात स्थापने पासून दैनंदिन समाज प्रबोधन व मनोरंजनाचे कार्यक्रम घेत असून अहेरीतील या नगरात धार्मिक वातावरण तयार झालं आहे. युवा शक्ती गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ कोरेत व अन्य सदस्यांनी पुढाकार घेऊन सदर कार्यक्रम संपन्न करीत आहेत. गुरु माऊली भजन मंडळ इंदाराम ने दरवर्षी भजनाचे कार्यक्रम येथे घेतात या वेळी भजन मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास कोत्तावडलावार, उपाध्यक्ष वसंत मेश्राम, सचिव साईनाथ गोमासे,सदस्य पेटी वादक पद्मनाभम कविराजवार, अविश दुर्गे, गणेश पोगुलवार, शुभम आऊतकर व टीम आणि युवशक्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष व आयोजन टीम व नागरातील भजन प्रेमी आणि बहुसंख्य महिला पुरुष उपस्थित होते.
