गणेश उत्सवा निमीत्त सांस्क्रुतीक कार्यक्रमासह समाजीक कार्याला भर…
गोंदिया : कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहावी, गुन्हे नियंत्रणात राहावेत यासाठी पोलिस आणि सर्वसामान्य नागरिकांमधील समन्वय महत्त्वाचा आहे. यासाठी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी गोंदिया जिल्ह्यच्या देवरी पोलिस वसाहतीत बाप्पा ची स्थापना करन्यात येते. अप्पर पेलिस अधिक्षक अशोक बनकर यांनी आखलेल्या रुपरेशेत व मार्गदर्शनात देवरी पोलिस वसाहतीने आयोजीत विविध सांस्क्रुतीक व सामाजीक कामाची व कार्यक्रमाची सर्वदूर चर्चा आहे.
अपर पोलिस अधिक्षक अशोक बनकर यांनी सर्वसामन्यांनी पोलिसांचा सन्मान करावा आणि त्याचप्रमाणे बाप्पाप्रमाणे पोलिसांनी देखील नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करावे, याच संकल्पनेतून दरवर्षी प्रमाने यावर्षीही देवरी पोलिस वसाहतीत बाप्पाची स्थापना केली आहे. अनेक ‘हाय प्रोफाइल’ आणि क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास उत्कृष्टपणे केल्यामुळे सतत चर्चेत असलेले देवरी पोलिस ठाणे आहे. पोलीस दलाचे कामकाज कसे चालते, पोलिसांना काम करताना येणाऱ्या अडचणी, सर्वसामान्य नागरिकांना मार्गदर्शक सूचना याची सर्व माहिती मिळावी यासाठी थेठ स्वताचे व पोलिस सहकारी कर्मचार्याचें मोबाईल नंबरचे फलक देवरी शहरातील प्रत्तेक चौकात पोलिस निरीक्षक रेवंचद सिगंनजुडे यानीं लावले होते.

देवरी शहरात गणेश मंडळानी, गणपत्ती बाप्पा उत्सवानिमीत्त अनेक समाजीक कामे हाती घेतली, पण “पोलिस वसाहतीतील बाप्पाची बातच निराली” होती. अप्पर पोलिस अधिक्षक अशोक बनकर यांच्या आखलेल्या नियमावली व मार्गदर्शनात सांस्क्रतीक व सामाजीक कार्यक्रमानां जास्त भर देत , कोनतीच कमतराता स्पर्धकानां व दर्शकांना भासली नाही. दि.8 सप्टेबंरला पोलिस वसाहतीतील बाप्पांच्या मंडपात आयोजीत सांसक्रुतीक व सामाजीक कार्यक्रमात भाग घेतलेल्या स्पर्धकानां अप्पर पोलिस अधिक्षक अशोक बनकर , पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, नगराध्यक्ष संजुभाऊ ऊईके, उपाध्यक्ष प्रद्ना संगीडवार , राष्ट्रवादी महिला अध्यक्षा पार्बता बाई चांदेवार, नगरसेवीका पिंकी कटकवार, सुमन बिसेन, सामाजीक महिला पुरूष व पोलिस अधिकारी कर्मचारी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन विजयी स्पर्धकांचा सत्कार करन्यात आला.
पोलिस वसाहतीतील बाप्पांचे विसर्जन दि.11 सप्टेबंरला होनार असुन , देवरी पोलिसानींच आखलेल्या डिजे मुक्त गणवतीची जानिव राखली जानार आहे. देवरी शहरात अनेक गणेश भक्ताकडुन स्थापन केलेल्या लाडक्या बाप्पांचे विसर्जन आजपासुन पोलिसांच्या निगरानीत व्हायला सुरूवात झाली आहे. तर भक्तगण व लहानगी लेकर बाप्पानां निरो