भरारी पथक व दक्षता समित्या अस्तित्वातच नाही..
गोंदीया:- वाळू व गौण खनिजाची अवैध उत्खनन व वाहतूकीवर प्रभावीपणे प्रतिबंध करण्याकरीता राज्य शासनाकडून संबंधित अधीनियमांमध्ये वेळोवेळी सुधारणा व कठोर उपाययोजना करण्यात आली आहे. तथापि गोंदिया जिल्ह्यात वाळू व गौण खनिजांची चोरी व तस्करी रोखण्यास खनिकर्म, महसूल, पोलिस विभाग पूर्णपणे अपयशी ठरत आहे. वाळू तस्करी व गौण खनिज चोरीवर आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेले भरारी पथक तसेच तालुका व ग्राम स्तरावरील दक्षता समित्या जिल्ह्यात अस्तित्वातच नसल्याचे जाणवीत आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 47 (7) अनव्ये अवैध उत्खनन व वाहतूक केलेल्या गौण खनिजांच्या बाजार मूल्याच्या 5 पटी पर्यंत दंड आकारण्याची तरतूद केलेली आहे. तसेच कलम 48 (8) नुसार गौण खनिजांच्या अवैध उत्खननासाठी वापरण्यात आलेली यंत्र सामुग्री व वाहतूक करणारे वाहन जप्त करण्याची तरतूदसुद्दा आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतूक होत असलेले ठिकाण निश्चित करून अचानक धाडी टाकून संबंधित दोषींवर दंडात्मक कार्यवाही व मुद्देमाल जप्त करण्यासाठी महसूल, पोलीस व परिवहन या तिन्ही खात्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले भरारी पथक नेमण्यात यावे, असे शासनाचे आदेश आहे.
आपल्या क्षेत्रातील रेतीघाटावर होत असलेल्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तालुका व ग्राम स्तरावर दक्षता समित्यासुद्दा स्थापन केल्या जाते. मात्र गोंदिया जिल्ह्यात व जिल्ह्याच्या तालुक्यातील भरारी पथक व दक्षता समित्या नीं अनेक महिन्यां पासुन अशी एकही भरीव कामगिरी बजावली नसल्याचे सर्वश्रुत आहे.

रक्षकच होत आहे भक्षक…
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीचे प्रकरण ज्या महसूल अधिकारी/ कर्मचारी यांच्या कार्यक्षेत्रात उघडकीस आले आहे, ते अधिकारी /कर्मचारी सदर प्रकारणास जवाबदार आहे किंवा कसे, याची कसून तपासणी करून दोषी आढळल्यास त्यांच्या विरुद्द शिस्त भंगाची कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे. त्याचप्रमाणे गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुक करणाऱ्यांसोबत महसूल, पोलीस व परिवार अधिकारी / कर्मचारी यांची संगनमत आढळल्यास त्यांच्या विरुद्द कठोरतम कारवाईचे करण्याचे शासन नियम आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी यांची समितीने जिल्ह्यात अवैध वाळू व खनिज तस्करी बाबत दरमहा आढावा बैठक घेणे गरजेचे आहे. वाळू व गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतुकी संबधी राज्य शासनाचे कडक धोरण आहे. परंतु ज्यांच्या खांद्यवर नियमाची अमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपविली आहे, दुर्देवाने तेच लोकं गौण खनिज व पर्यावरणाचे सर्वात मोठे भक्षक तर झाले नाहीना असाही सवाल उपस्तीत होत आहे.
देवरी तालुक्यात राती चाले खेळ

अख्या तालुक्यात रात्री छुप्या पद्धीने मोठ – मोठ्या टिप्पर व ट्रक्टर ने रेती आनली जात आहे. त्या सोबतच देवरी तालुक्याच्या अनेक ग्रामीन भागात अवैध मुरुम उत्खनन जोरात सुरु आरे. पन्नास रॉयलटी काढत पाचशे ट्रीप मुरुम खोदल्या जात आहे. तालुक्यात कुठेही गट मंजुर नसुनही शेतकर्यांची शेती खोलीकरनाच्या नावावर चांगलच शाशनाचा महशुल लुटल्या जात आहे. सतत या वाहनांच्या करकस आवाजाने शहरवाशी चांगलेच त्रस्त झाले आहेत. सोबतच तालुका परिसरातील घाटावर अनेक ठिकानी रेती माफीयानीं रेतींचे ढीगारे जमा करुन ठेवले आहेत. अनेकदा तहसील प्रशासनातर्फे कारवाई करुनही अवैध रेती वाहतुक शुरूच आहे. आता रात्री दरम्यान होत असलेल्या अवैध रेतीच्या वाहतुकीवर देवरी महसुल विभाग काय कारवाही करते या कडे आता सगळ्या शहर वाशीयांचे लागले आहे.