गुल्लकातील जमा रुपये अतिव्रुष्टीत नुकसान झालेल्या त्या 40 कुटुंबाच्या मदतीला दान…

गोंदिया : गोंदिया जिल्हाचे अपर पोलिस अधिक्षक असोक बनकर यांच्या संकल्पनेने “एक काम वतन के नाम” या सामाजीक उपक्रमाअंतर्गत अतिव्रुष्टीचा फटका बसलेल्या नागरीकांना मदत करन्याचे आव्हान करन्यात आले होते. याचीच दखल घेत Ntv मराठीने बातमी प्रकाशीत केली होती. याच बातमीला प्रेरीत होऊन देवरी शहरातील सचरुप कौर भाटीया नामक 6 वर्षाच्या लहानग्या चिमुरडीने आपल्या आई – वडलानां आग्रहाने मागुन खाऊकरीता वाचवुन ठेवलेले गुल्लकातील रुपये देवरी शहरातील त्या 40 घंराच्या नुकसानीच्या मदतीकरीता पोलिस अधिक्षक अशोक बनकर यांच्या स्वाधीन केले आहे.

गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरात अतिव्रुष्टीमुळे एकुण 40 कुटुंबाना चांगलाच फटका बसला होता. त्यांचे अखे कुटुंब रसत्यावर आले आहेत. त्यानां मदतीचा हात म्हणुन आप-आपल्या परीने आर्थिक मदत करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार करन्याचे आव्हान अपर पो. अधिक्षक असोक बनकर यांनी केले होते. या करीता माहीतीस्तव अपर पोलीस अधिक्ष कार्यालय देवरी याठीनी संपर्क साधन्याचेही आव्हान करन्यात आले होते. तसे सचरुप चे पालक यानीं संपर्क साधत स्वता लेकी सोबत पोलिस अधिक्षकांची भेट घेतली. मुलिने खाऊ करीता गुल्लकात जमा केलेले रुपये व दाखविलेली समाजीक मदतीची उत्सुकता व देवरी शहरात अतिव्रुष्टीमुळे नुकसान झालेल्या त्या 40 कुटुंबाना माझ्या गुल्लकातील या रुपयानीं काही प्रमानात सहकार्य करावे हे शब्द बोलत सचरुप या लहानग्या मुलीने गुल्लकातील रुपये त्या 40 कुटुंबाच्या मदती करीता दान केले.

देवरी शहरात अतिवृष्टीमुळे अनेक भागातील नागरीकांच्या घरात पाणी शिरून शेकडो लोकांचे प्रचंड नुकसान झाले होते. झालेल्या अतिव्रुष्टीने हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. घरातील अन्नधान्याची यात नासाडी झाली. यातील अनेक कुटुंबे कमकुवत आर्थिक गटातील असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली. घरातील साहित्या-बरोबरच मुलांच्या शैक्षणिक साहित्याचेही नुकसान झाले. देवरी शहरातील अतिव्रुष्टीचा फटका बसलेल्या त्या 40 ही कुटुंबाना तातडीने आर्थिक मदत व्हावी याच उद्देशाने अपर पोलिस अधिक्षक असोक बनकर यानीं “एक काम वतन के नाम” या उपक्रमाची सुरूवात केली. देवरी नगरपंचायतचे मुख्याधीकारी व पोलिस विभागाच्या संयुक्त पद्धतीने लवकरच त्या ४० कुटुबांना सहकार्य करनार असल्याचेही बनकर यानीं सांगीतले आहे. व लहानस्या सचरुप लेकीने स्वताच्या गुल्लकातील खाऊकरीता वाचवीलेल रुपये दान करुन ‘एक काम वतन के नाम’ उपक्रमाला सुरूवात केली. त्या लेकीची सामाजीक बांधीलकीची प्रेरना घेत त्या 40 कुटुंबाना मदत करन्याकरीता नागरीकानीं समोर येन्याचे आव्हान अपर पोलीस अधिक्षक बनकर यानीं केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *