नाशिक : सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या व वणी बाजूकडून गडावर (रडतोंडी पायरी मार्ग) जाणाऱ्या मार्गावर असलेल्या चंडीकापूर गावात स्मशान भूमीच नसल्याने ग्रामस्थांना भर पावसात रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. यामुळे मृत आत्म्याच्या वेदना मृत्यूनंतरही संपत नसल्याचा प्रत्यय आला. पार्थिवाचे होत असल्याचे विदारक चित्र बघून शोकाकुल नातेवाइक व ग्रामस्थ अधिकच गहीवरले.
सप्तशृंगी गड, चंडीकापूर परीसरात गेल्या चार- पाच दिवसांपासून सुरु असून अशातच चंडीकापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाळू जोपळे यांच्या सुन सविता मंगेश जोपळे वय २२ यांचे रविवारी, ता. १८ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचेवर दुपारी दीड वाजेच्या सुमारास चंडीकापूर येथे अंत्यविधी करण्याचे ठरले होते. चंडीकापूर येथे नोंदणीकृत स्मशान भूमी व शेड नसल्याने पूर्व परंपरेनूसार बारव ओहाळाच्या किनारी असलेल्या मोकळ्या अंत्यविधी करण्याची तयारी नातेवाईक व ग्रामस्थांनी केली होती. त्यासाठी अत्यंसंस्कारासाठी सरणही रचले. याच वेळी सप्तशृंगी गड व परीसरात जोरदार पाऊस आल्याने बारव ओहाळाला पूर येवू लागल्याने ओहळाच्या किनारी रचलेले सरण वाहून जावू नये म्हणून नातेवाईक व ग्रामस्थांनी धावपळ करीत रस्त्यावर आणले. ओहळाला आलेला पूर व सुरु असलेला पाऊस त्यामूळे अत्यंविधीसाठी दुसरी जागा नसल्याने चंडीकापूर – भातोडे रस्त्यावरीस बारव ओहाळाच्या पुलावर रस्त्याच्या बाजूला अत्यंविधी करण्याचा निर्णय घेवून भर पावसात पुन्हा एकदा सरण रचून पार्थिवावर छत्रीचा आडोसा करुन अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी पाऊसामूळे चरणाची लाकडे ओले झाल्याने डिजेलचा वापर अधिक प्रमाणात करावा लागला. मृत्यूनंतर शेवटच्या क्षणी सुध्दा भर पावसात मृत व्यक्तीवर अंत्यंसंस्कार होतांना पार्थिवाचे होत असलेले हालाचे विदारक चित्राने नातेवाईकामंध्ये संताप व्यक्त होता. चंडीकापूर येथे स्मशानभूमी नसल्याने वर्षानुवर्षे मुख्य चंडीकापूर – भातोडे रस्त्यावर बारव ओहळाच्या किनारी असलेल्या खाजगी मालकीच्या जागेत पूर्वापार पासून अंत्यविधी केले जात आहेत. सदर जागेत स्मशानभूमी व शेडसाठी जागा ग्रामपंचायतीची जागा नसल्याने व जमिन मालकाचा विरोध असल्याने पावसाळ्यात अंत्यविधी करताना ग्रामस्थांना मोठ्या हलाखीला तोंड द्यावे लागत आहे. शेकडो वर्षांपासून परंपरेनूसार सदर जागेत ग्रामस्थ अंत्यसंस्कार करीत आहे. सदर जागेवर ग्रामस्थांच्या भावना असल्याने त्या जागेवरच स्मशानभूमीसाठी प्रशासनाने जागा उपलब्ध करुन स्मशानभूमीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी चंडीकापूरच्या सरपंच नंदा कुवर, दिंडोरी बाजार समितीचे संचालक पंडीत बहिरम, प्रकाश मोंढे, हरी गांगोडे, जयराम पालवी, धनराज कुवर आदींनी केली आहे.