नाशिक : डहाणू, ३१ मार्च, २०२२: राज्य वीज कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या महासंघाने २८ व २९ मार्च रोजी केंद्र सरकारच्या वीज क्षेत्राच्या खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात संप पुकारला होता. यावेळी राज्य सरकारची वीज निर्मिती कंपनी महाजेनकोच्या व्यवस्थापनाने अदाणी डहाणू थर्मल पॉवर स्टेशन (एडीपीटीएस) कडे नाशिकचे ९१० मेगा वॅट क्षमतेचे केंद्र पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्यासाठी कर्मचारी पाठवण्याची विनंती केली होती, अदाणी डहाणू औष्णिक ऊर्जा प्रकल्पा (एडीपीटीएस) ने या विनंती वरून १० अभियंत्यांचा एक चमू पाठवला होता, ज्याने नाशिक वीज केंद्र पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली असे एडीपीटीएसच्या सूत्रांनी सांगितले.

नाशिक येथील संच क्रमांक ३ ग्रीडशी जोडण्यात नाशिक केंद्राच्या व्यव्यस्थापनाची सहायता केली तसेच युनिट क्रमांक ४ जे बंद पडले होते ते सुरु करण्यास ही मदत केली. बॉयलर प्रज्वलीत करून सर्व यंत्रणा ग्रीडशी जोडण्यासाठी सुसज्ज केली. नाशिक औष्णिक केंद्रात काम करत असताना एडीपीटीएसच्या चमूने सर्व प्रकारची काळजी घेऊन, सुरक्षा विषयक नियमांचे पालन केले.

ऊर्जा क्षेत्रात खाजगी करणाला विरोध दर्शविण्यासाठी राज्यात ऊर्जा कामगार समितींनी २८ आणि २९ मार्च २०२२ एकत्रित पुकारलेल्या संपामुळे महानिर्मितिचा नाशिक येथील एकलहरे औष्णिक ऊर्जा प्रकल्प चालवण्यासाठी अनुभवी इंजिनियर्सची गरज होती. महानिर्मितीने, अदाणी डहाणू औष्णिक ऊर्जा प्रकल्पाकडे मदत मागून कर्मचारी पाठवण्याची मागणी केली. यावर अदाणी डहाणू औष्णिक ऊर्जा प्रकल्पाकडून त्वरित १० इंजिनियर्सची तुकडी नाशिकला पाठवण्यात आली. छायाचित्रात अदाणी डहाणू औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे इंजिनियर्स नाशिक प्रकल्पात संपाच्या काळात काम करताना दिसत आहेत.