section and everything up until
* * @package Newsup */?> महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संघटनेच्या उपाध्यक्षपदी किशोर मरकड यांची निवड | Ntv News Marathi


अहमदनगर : महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार किशोर मरकड यांची नियुक्ती करण्यात आली

महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संघटनेच्या उपाध्यक्षपदी किशोर मरकड यांची निवड

या संदर्भात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे पत्र त्यांना दिले आहे किशोर मरकड हे गेली पंचवीस वर्षापासून पत्रकार क्षेत्रात कार्यरत असून दैनिक लोकयुग, लोकसत्ता, गीतांजली, लोकमत या विविध दैनिकात त्यांनी बातमीदार म्हणून काम केले आहे तसेच त्यांचे स्वतःचे चांगभलं या नावाने साप्ताहिक आहे व सध्या ते दैनिक समाचार या दैनिकाचे विशेष प्रतिनिधी असून अहमदनगर प्रेस क्लबचे माजी सचिव आहेत चैतन्य ब्लॉगच्या माध्यमातून ते सोशल मीडियात सुद्धा कार्यरत आहेत तसेच नगर येथील चैतन्य पब्लिसिटी व ट्रॅव्हल्स या फर्मचे ते संचालक आहेत त्यांच्या निवडीबद्दल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार अरुण काका जगताप, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिकाताई राजळे, प्रेस क्लबचे व डिजिटल मीडिया संपादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिर्के यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की पत्रकारितेच्या क्षेत्रातील जी मंडळी स्थानिक वृत्तवाहिन्या, वेबसाइटच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या बातम्या चे संचालक, विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून या माध्यमांशी संबंधित असलेले पत्रकार यांना व्यासपीठ मिळवून देणे हा या संघटनेचा हेतू असून या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *