नगर : जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज यासंदर्भात जिल्हयातील सर्व नगरपरिषद, पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. कोरोना संकटात प्राणवायू अर्थात ऑक्सिजनची आवश्यकता व मोल अधोरेखीत झाले. ऑक्सिजन पुरवठ्याअभावी देशात अनेक रूग्णांची दुर्देवाने जिवीतहानी झाली. शहरी भागात वाढते वायू प्रदूषण लक्षात घेतमाहे जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्हयातील नगर परिषद, पंचायत क्षेत्रात प्रशासकिय यंत्रणा व लोकसहभागातून ‘एक व्यक्ती-एक झाड’ अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी नगर परिषद, नगरपंचायतीनिहाय वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देखील निश्चीत केले आहे. श्रीरामपूर नगर परिषद ९० हजार, संगमनेर ९० हजार, कोपरगांव ९० हजार, राहुरी ५० हजार, देवळाली प्रवरा ४० हजार, राहाता ३० हजार, पाथर्डी ३० हजार, श्रीगोंदा ३५ हजार, शेवगांव ४० हजार, जामखेड ४० हजार, शिर्डी नगरपंचायत ४० हजार, अकोले २० हजार, कर्जत ३० हजार, पारनेर २० हजार आणि नेवासा २५ हजार असे एकूण ६ लाख ७० हजार वृक्ष लागवड व संवर्धनाचे उद्दीष्ट निर्धारीत करण्यात आले आहे.