जालना : वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांच्या दौर्याच्या पुर्व तयारी साठी मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटिल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व जालना जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे पश्चिम व जालना जिल्हा अध्यक्ष पूर्व भालचंद्र भोजने यांच्या उपस्थितीत संयुक्तिक बैठक दि.20/8/2021 रोजी दु 1:00 वा फ्लोराईन होटेल औरंगाबाद चौफुली जालना येथे होणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष यांनी पत्राव्दारे कळविले आहे.वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीत वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांच्या दौर्यासाठी पूर्व तयारी करण्यात येणार असून पक्षांच्या जिल्हा, शहर, तालुका ,युवक व महिला पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून पुढील दौर्याची रूपरेषा ठरणार आहे.तरी या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्ह्यातील (पूर्व पश्चिम) जिल्हा, शहर,युवक,तालुका,व महिला पदाधिकारी यांनी आवर्जून बैठकीस उपस्थित राहणे गरजेचे आहे तसेच वंचित बहुजन आघाडीच्या महिला व पुरूष कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष यांनी केले आहे.
जालना घनसांगी प्रतिनिधी
राजेश वाघमारे