चंद्रपूर , मूल : (प्रतिनिधी) महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघातर्फे संपुर्ण राज्यात सदस्यांचे वाढदिवस सामाजीक उपक्रमानी साजरे केले जातात. हि परंपरा कायम ठेवून राज्य पत्रकार संघाचे मूल तालूका सदस्य नंदुजी दुर्गे यांचा वाढदिवस उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांना फळवाटप करून साजरा करण्यात आला. तालुका अध्यक्ष सतिश आकुलवार,सरचिटणीस मनिष रक्षमवार यांचे नेतृत्वात उपजिल्हा रूग्णालयात पार पडलेल्या या फळवाटप कार्यक्रमात तालुका शाखेचे पदाधिकारी सर्वश्री राजेश वाढई, आशिष बरेवार, नितेश म्याकलवा र, आशिष कोरेवार सदस्य उपस्थित होते. या फळवाटप कार्यक्रमास शासकीय उपजिल्हा रूग्णालयातील सर्वआरोग्य अधिकारी,परिचारीका, कर्मचारी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले व नंदुजी दुर्गे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.