शिरूर ताजबंद इंद्रायणी येथे शेतकऱ्यांच्या वतीने आमदार बाबासाहेब पाटील यांचा सत्कार
लातूर : अहमदपूर तालुक्यातील मन्याड प्रकल्पाच्या 9 कोल्हापूरी बंधा-याचे बॅरेजेसमध्ये रुपांतर करण्याची प्रकिया आणि विस्ताराकरिता तत्वतः मान्यता मिळाली आली आहे.या मुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असुन आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांनी दिलेला शब्द पाळला या बद्द्ल अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शिरूर ताजबंद येथे सत्कार करण्यात आला. असुन लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. कामाला परवानगी मिळाल्याबद्दल तालुक्यातील कोपरा, धानोरा, शेनकुड, टाकळगाव, सोनखेड, मानखेड, मावलगाव, सोरा, चिलखा, तांबटसांगवी, सुनेगाव शेंद्री, रुद्धा, येथील शेतकऱ्यांच्या वतीने सामूहिक सत्कार केला. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना प्रामुख्याने जास्तीत जास्त विकास कामावर भर दिला. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची टंचाई भासत होती. हाच प्रश्न लक्षात घेऊन जलसंपदामंत्री मा.ना.जयंत पाटील साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. आता बॅरेजस मध्ये रूपांतर करण्याची परवानगी मिळाली आहे. या मुळे तालुक्यातील शेत शिवार आणखीन हिरवाई ने बहरणार आहे.
लातूर जिल्हा ब्युरो चीफ अफजल मोमीन एन टी व्हि न्युज मराठी लातूर 9890047700 /9822595931