मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवांवर वेगवेगळ्या चर्चेला उधाण
नाशिक : कळवण तालुक्यात गेल्या काही दिसांपासून मुले पळविणारी टोळी दाखल झाले आहे असे अशा चर्चेचे सतत मेसेज व्हायरल केले जात आहेत त्यात कुठलेही तथ्य नसून नागरिकांनी व पालकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये व तसे काही संशयास्पद वाटत असेल तर टोल फ्री क्रमांक 112 या क्रमांकावर माहिती द्यावी असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिसांकडून आव्हाहन करण्यात आले
असून गेल्या पंधरा दिवसापासून लहान मुले पळविणारी टोळी कार्यरत झाले असून त्यांच्याकडून लहान मुले पळवून नेले जात असल्याच्या निराधार चर्चेला उधाण आले असताना विशेषतः व्हाट्सअप वर प्रचंड वेगाने व्हायरल केला जात आहे वास्तविक वास्तव कळवण तालुक्यातील खेड्यापाड्यांमध्ये ही चर्चा जास्त रंगताना दिसून येत आहे मुले पळविणारे टोळी असे आजपर्यंत काहीही आढळले नाही किंवा कुठलीही तक्रार नाही असे अभोना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितिन शिंदे यांनी सांगितले . त्यामुळे हा मेसेज किंवा या चर्चा खोट्या असल्याच्या या अशा निराधार अफवांना कोणीही बळी पडू नये जे व्यक्ती समूह असे मेसेज वायरल करून समाजात भीती व धोका निर्माण करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार अशा चुकीच्या मेसेज मुळे एखाद्या निष्पाप नागरिकाचा झुंडकळीत जीव जाऊ शकतो त्यामुळे मारहाण करणाऱ्यांची ओळख निष्पन्न करून घ्यावी असे आवाहन अभोना पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे…