नाशिक : प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित प्रसंगी छत्रपती शाहू महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिंचोली जहागीर सांस्कृतिक प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा. पी. आर.खरात सर यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी जर शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये असलेले सुप्त गुण ओळखून त्यांना विविध मार्गाने खुले व्यासपीठ निर्माण करून देणे गरजेचे असून विद्यार्थ्यांना हस्ताक्षर स्पर्धा निबंध स्पर्धा नाटिका पथनाट्य मनोरंजनात्मक विविध गायन भारुड रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा प्रबोधन पर विचार मांडण्यासाठी विचारपीठ निर्माण करून देणे गरजेचे आहे. सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी- चिंचोली जहागीरच्या पंचक्रोशीतील पालक नागरिक उपस्थित आढळून आलेले आहेत. जि. प. सोनोशी जि. प. आडगाव राजा जिल्हा परिषद वडाळी जिल्हा परिषद सुलजगाव जिल्हा परिषद वर्दडी बु. जिल्हा परिषद चिंचोली जहागीर वैभव माध्यमिक विद्यालय वर्दडी बु. या शाळेने सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक म्हणून माननीय श्री विनोद भाऊ वाघ व माजी खासदार माननीय सुखदेवजी काळे ,पंचायत समिती विषय तज्ञ पद्माकर गवई चिंचोली जहागीरचे सरपंच भगवान पालवे आडगाव राजाचे केंद्रप्रमुख मिरा पवार उपस्थित होते. माजी प.स.सदस्य महादेव घेंबड उपस्थित होते व तसेच सोनदेव सरपंच श्री गजानन ढाकणे वडाळीचे सरपंच सूर्यकांत काकडे लिबखेडचे सरपंच श्री आखाडे उपसरपंच अनुसाताई म्हस्के वर्दडी बु.उपसरपंच संतोष काळे ग्रा. प.सदस्य संजय मुंडे सुधाकर साळवे सदस्य ग्रा.प. उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक- संस्थेचे प्राचार्य श्री राजेंद्र काळे सर यांनी केले सूत्रसंचालक – श्री व्हि. एन. काकडे सर यांनी केले आभार प्रदर्शन श्री आर आर खरुळे सर यांनी मांडले सांस्कृतिक कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते