section and everything up until
* * @package Newsup */?> गडचिरोली पोलीस दलाची अभिमानास्पद कामगिरी | Ntv News Marathi

 21 अधिकारी व अंमलदार यांना मिळाले राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व 01 अधिकारी यांना मिळाले गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक.

पोलीस दलात कार्यरत असतांना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमीत्त शासनाकडुन सन्मानित केले जाते. यावर्षी सुध्दा गडचिरोली पोलीस दलातील 21 अधि./अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व 01 अधिकारी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. निश्चितच गडचिरोली पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद कामगिरी आहे.
राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार 1) अपर पोलीस अधी.- मंजुनाथ हुचप्पा सिंगे भापोसे. 2) अपर पोलीस अधी.- हरी बालाजी एन. भापोसे. 3) डिवायएसपी- नवनाथ ठकाजी ढवळे 4) सपोनि- योगेश देवराम पाटिल 5) पीएसआय- सुदर्शन सुरेश काटकर 6) पोहवा/लिंगनाथ ननैय्या पोरतेट 7) पोहवा/ रोहिदास सिलुजी निकुरे 8) नापोशि/ अरविंद कुमार पुरनशाह मडावी 9) नापोशि/मोरेश्वर पत्रु वेलादी 10) नापोशि/प्रविण प्रकाशराव कुलसाम 11) नापोशि/ सडवली शंकर आसाम 12) नापोशि/ आशिष देविलाल चव्हाण 13) पोशि/ बिच्चु पोचय्या सिडाम 14) पोशि/शामसाय ताराचंद कोडापे 15) पोशि/ नितेश गंगाराम वेलादी 16) पोशि/ पंकज सिताराम हलामी 17) पोशि/ आदित्य रविंद्र मडावी 18) पोशि/ रामभाऊ मनुजी हिचामी 19) पोशि/ मंगलशाह जीवन मडावी 20) पोशि/ ज्ञानेश्वर देवराम गावडे 21) पोशि/ शिवा पुंडलिक गोरले तसेच सपोनि. मोतिराम बक्काजी मडावी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक मिळाले आहेत.

राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्राप्त सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी असतांना उल्लेखनिय व वैशिष्ट्यपुर्ण कामगिरी केलेली आहे. या कामगिरीची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक बहाल करण्यात आलेले आहे. सदर पोलीस अधिकारी व अंमलदारांनी उल्लेखनिय व वैशिष्टयपुर्ण कामगिरी केल्याबद्दल गडचिरोली पोलीस दलाचे वतीने त्यांचे मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी कौतुक केले असुन त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *