
नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा लागू करण्याची मागणी किसान युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष संभाजी विश्वंभर पाटील शिंदे व अंतरगाव येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे नायगाव तालुक्यात चालू खरीप हंगाम पूर्णतः धोक्यात आला असून अतिवृष्टीमुळे शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व अंतरगाव येथील गोदावरी काटे असलेले चारही बाजूने मोठे झाले ढगफुटी जमिनी खरडून जाणे दुबार पेरण्या करून शेतकऱ्याने बिकट परिस्थिती असताना पिक विमा भरला त्यामुळे शासनाने शेतकऱ्याचे सरसकट पिक विमा मंजूर करून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती मधून वाचवावे व मदत करावी अशी मागणीचे निवेदन किसान युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष संभाजी पाटील शिंदे व आंतरगावचे सर्व शेतकऱ्याने तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे या निवेदनावर संभाजी विश्वंभर शिंदे, किशन बाबाराव शिंदे ,बालाजी माणिक शिंदे, शिवाजी नागोराव शिंदे ,यादव शिंदे ,प्रभाकर सोनाजी शिंदे, प्रल्हाद रामचंद्र ,किशन गंगाराम, बाबू आत्माराम ,नामदेव पवार, नवनाथ कामाजी, तुकाराम तेजराव, ज्ञानेश्वर आनंदराव, गंगाधर मारुती, गंगाधर गोविंदराव, हरी मोहन, शिवाजी रघुनाथ, नामदेव किशन, बालाजी प्रभू ,विश्वनाथ मुजाजी, बालाजी विठ्ठल , आदी शेतकऱ्यांनी केली आहे