नांदेड : बिलोलीच सहायक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यानी संयुक्त पथक तयार करून काहाळा( बु )ही सर्वांत मोठया गुटखा आडयावर धाड मारत आरोपीच्या मुसक्या आवळल्या ने नव्याने या गुटखा व्यवसायात आलेल्या गुटखा माफीयाचे धाबे दणाणले आहेत. गेली आनेक वर्षापासून काहाळा येथील मुस्ताफा शेख गुटखा विक्रीचा व्यवसाय नायगांव, लोहा , कंधार या तीन तालुक्यात राजरोस पणे करत होता पान शाॅप च्या नावाखाली अवैध गुटखा विक्रीचा बेभान पणे चालवत होता. सहायक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या धडकूबाज कारवाईने शेख मुस्तफा याचा अवैध गुटख्याचा आड्डा उध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले .

 सहायक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीवरून काहाळा( बु)  येथील अवैध गुटखा विक्रेत्याच्या घरावर धाड मारत पावणे तेरा लाखाचा गुटाखा जप्त करून एका आरोपीस आटक करण्यात आली आहे . आलीकडच्या काळातील सर्वाती मोठी गुटख्याची कारवाई आसल्याचे समजते. 
  नायगांव तालुक्यात काहाळा (बु) येथील मुस्तपा जमेल शेख हा गेली आनेक वर्षापासून गुटखा विक्रीचा व्यवसाय मोठ्यात प्रमाणात करतो . सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना काहाळा( बु ) येथील एका टीन शेडच्या घरात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आसल्याची गोपनिय माहीती मिळाल्याने त्यांनी नायगांव पोलीस आणि कुंटूर पोलीस आणि रामतीर्थ पोलीस यांचे संयुक्त पथक करून १३ऑक्टोबर च्या  ९ वाजेच्या सुमारास खाजगीत वाहनात जाऊन ही मुस्तफा शेख यांच्या घराववर धाड मरत १२ लाख ७१ हजार ४९ ० रूपायचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे .नायगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या तक्रारीवरून आरोपी मुस्तफा जमिल शेख यांच्या विरोधात कुंटूर पोलीस ठाण्यात कलम 188 , 272,273, 328, भादवी सह अन्नसुरक्षा व मानदे कायदया अंतर्गत 26 (2 ) 27, 30( 2),(अ) कलम चा भंग करून शिक्षा पात्र 59 प्रमाणे कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सपोनि महादेव पुरी हे करत आहेत. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी नायगांव, रामतिर्थ आणि कुंटूर पोलीसानी परिश्रम घेतले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *