नांदेड : नायगाव तालुक्यातील इकलीमाळ येथील संत पर्वतेश्वर महाराज यांच्या मंदिरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी पर्वतेश्वर महाराजांचे दर्शन घेतले व हजारो नारळ धुनि मध्ये टाकून महाप्रसादाचा लाभ घेतला कोजागिरी पौर्णिमेनिमित्ताने इकलीमाळ येथील पर्वता महाराज यांच्या मंदिरात सकाळी परडवाडी व ईकळीमाळ येथील संत पर्वतेश्वर महाराज यांच्या भक्तांनी महाराजांच्या मूर्तीच्या महा अभिषेक करून पूजा अर्च्या झाल्यानंतर महाप्रसाद च्या आयोजन करण्यात आले होते रात्री कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर एक हजार लिटर दुधाचा महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी नायगाव उमरी तालुक्यातून व परिसरातील मोठ्या प्रमाणात भाविक या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले पर्वता महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी गावकऱ्यांच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली येणार्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. पर्वतेश्वर महाराजांचे मंदिर म्हणजे मिनी शिर्डी या नावाने ओळखले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *