सामाजिक,धार्मिक,अन्नदान कार्यक्रम संपन्न
नांदेड : कुंडलवाडी येथे ईस्लाम धर्माचे शेवटचे प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांचा जयंती निमित्त अहेले सुन्नत वल जमात चा वतीने विविध सामाजिक,धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करीत शहरातून जुलूसे ईद ए मिलादून्न नबी मिरवणूक उत्साहात काढत सन साजरा करण्यात आले.यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांचा सहभागी झाले होते.

दर वर्षा प्रमाणे याही वर्षी ईस्लाम धर्माचे शेवटचे प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांचा जयंती निमित्त शहरातील अहेले सुन्नत वल जमात चा वतीने विविध सामाजिक,धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करीत शहरातून जुलूसे ईद ए मिलादून्न नबी मिरवणूक उत्साहात काढण्यात आले.या मिरवणूकीची सुरूवात मुन्वर मस्जिद येथून झाली तेथून नवरंग जनरल स्टोर समोरून,जोड मारोती चौक,कुंभारगल्ली मार्गे,डाॅ.हेडगेवार चौक,मुख्यबाजारातून मैनुद्दीन याच्या भुसार दुकाना समोरून,दस्तीगीर चौक मार्गे शतरंजीगल्ली हून खुरेशी मोहोल्ला येथील शेख शखशावली दर्गा येथे फातीहा सलाम नंतर मिरवणूकीचा समारोप करण्यात आले. या दर्म्यान आलीम,खारी,हाफीज गुलाम यासीन सहाब रामपूर उत्तर प्रदेश यांनी प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांचा जिवनी संदर्भात उपस्थिताना मार्गदर्शन केले. सेच समाज बांधवाने शहरबत,फळ वाटप,बिस्किटांचे वाटप केले.

तसेच ईमामे खासम ईद ए मिलादून्न नबी कमेटी तरूणांचा वतीने सपोनी.विश्वजित कासले,सपोउनी.विशाल सुर्यवंशी,बिटजमादार कदम,पोका.ईद्रीस बेग,माकुलवार,आलीम,खारी,हाफीज गुलाम यासीन सहाब रामपूर उत्तर प्रदेश,हाजी.नवाब मौलाना,हाफीज माजिद सहाब,हाफीज गुलाम यासीन,हाफीज मुस्ताख सहाब,हाफीज हसन सहाब,ईद ए मिलादून्न नबी कमेटी अध्यक्ष शेख मैनुद्दीन अल्हज मगदूमसाब,पत्रकार मोहम्मद अफजल,शेख वहाब आदींचा सन्मान सत्कार करण्यात आले.
यावेळी सपोनी.विश्वजित कासले,सपोउनी.विशाल सुर्यवंशी यांनी मुस्लिम बांधव ईद ए मिलादून्न नबी मिरवणूक शांततेत,कायदा व सुव्यवस्था आबाधीत ठेवून पोलिस प्रशासन सहकार्य केल्याबद्दल सर्व समाज बांधवाचे धन्यवाद व्यक्त केले.

शेवटी अन्नदान कार्यक्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात कायदा सुव्यवस्था आबाधीत नादावे यासाठी सपोनी.विश्वजित कासले,सपोउनी.विशाल सुर्यवंशीव त्यांचे पोलिस कर्मचारी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शतरंजीगल्ली,खुरेशी मोहोल्ला,बागवानगल्ली,नयाबादी,गुलजार मस्जिद परिसर व शहरातील मुस्लीम तरूणांनी परिश्रम घेतले.