औरंगाबाद : औद्योगिक वाळूज नगरीतील बजाजनगरात सामान्य कामगार वर्गाला आणि जनतेला सुलभ आरोग्य सुविधा मिळावी या हेतूने भोकरे ग्रुपचे कैलास भोकरे यांच्या कन्येचे डॉ.कोमल भोकरे, एमके हॉस्पिटल बजाजनगरात नावारूपास आले आहे, नुकताच या वैद्यकीय हॉस्पिटल चा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा रोजी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार चंद्रकांतजी खैरे यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा कार्यक्रमाला उद्घाटक चंद्रकांत खैरे,ऍड आशुतोष डंख,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वाळूज महानगर अध्यक्ष अर्जुन आदमाने,शिवसेना उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, शिवसेना पश्चिम संभाजीनगर उपतालुकाप्रमुख कैलास भोकरे,ग्रामपंचायत सदस्य मंदाताई भोकरे,ङाँ.कोमल भोकरे, ङाँ.बी.जी.गायकवाड, विष्णु जाधव,आसाराम करपे, महेंद्र खोतकर,विरेंद्र चौधरी, आणा कांडेकर,बालागिरी महाराज, साहेबराव इंगोले,यांच्या सह बजाज नगर परिसरातील नागरिकांची या उद्घाटन सोहळा कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळुज औरंगाबाद- 8484818400