औरंगाबाद : 25 ऑक्टोबर, सकाळीं संकट मोचन मंदिर समोर,व नौगजी बाबा दर्गा परिसर, निराधार,दीन, दुबळयांना दिवाळी भेट म्हणून साडी ,चोळी,व टॉवेल कपडे वाटप, करण्यात आले. सीआरपीएफ चे सेवानिवृत्त गौतम अशोकराव गायकवाड, सेक्रेटरी ऑल इंडिया सेंट्रल एक्स पैरामिलिटरी वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र, शहर अध्यक्ष माळी महासंघ वैजापूर, तसेच त्यांच्या मातोश्री समाज सेवक सुमनबाई अशोकराव गायकवाड, तसेच समाजसेवक धोंडीरामसिंह राजपूत, सर यांनी पुढाकार घेऊन हे कार्य करतांना सामजिक बांधिलकी चे दर्शन झाले.

या वेळी सर्व अनाथ महिलांचे अश्रू अनावर झाले होते.स्वतः घरी फटाके न फोडता ते पैसे अनाथांना देऊन त्यांची हि दिवाळी चांगली व्हावी, ध्वनी प्रदूषण न करता प्रदूषण मुक्त दिवाळी करण्याचा एकमेव हेतु, आपल्या साठी कोण्ही ही करते दुसऱ्या साठी जाती भेद विसरून जो करतों तोच खरा माणूस असे ही गौतम गायकवाड यांनी सांगीतले.. स्वच्छ्ता दुत समाजसेवक, धोंडीराम सिंह ठाकूर सर यांनी दिवाळी सर्वांना शुभेच्छा दिल्या,