वैजापूर शहरातील भाजपाचे शहराध्यक्ष दिनेशभैय्या राजपूत यांच्या प्रभाग क्र.११ मधील सातत्याने साफसफाई करुण नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे स्वच्छता कर्मचारी तसेच नळाला पाणी सोडणारे कर्मचारी,घंटागाडी कर्मचारी,लाइट मेन्टेनन्स कर्मचारी यांना दिवाळीच्या निमित्ताने वैजापूर शहराच्या नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांच्या हस्ते फराळ व सप्रेम भेटवस्तू देऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांन प्रती कृतज्ञता व्यक्त केली

त्यावेळी नगरसेविका जयश्री राजपूत,नगरसेवक राजेश गायकवाड, व्यापारी आघाडीची जिल्हाउपाध्यक्ष शैलेश पोंदे,शहर उपाध्यक्ष प्रदीप चव्हाण, वैजापूर नगरपरिषदेचे सहाय्यक स्वच्छता निरीक्षक विष्णू आलुले,प्रमोद निकाळे स्वच्छता कर्मचारी अहमदभाई,चेतन निखाडे,गणेश टिभे,तुरे मामा,गवळी मामा,बाळू बागुल व कर्मचाऱ्यांची उपस्तीथी होती त्याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन आभार मानले.