ग्रामपंचायत मात्र घेत आहे झोपेचं सोंग
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील सावळदबारा ग्रामपंचायत यांचा मनमाणी कारभार थांबता थांबेना सध्या देशामधे दिवाळी सन पुर्णपणे साफसफाई करुन मोठ्या धुमधाम मधे पुर्ण तय्यारी ने दिवाळी सन साजरा करण्यात येत आहे कारण दोन तीन वर्ष हे कोरोना काळात तसेच निघुन गेले त्यामुळे दिवाळी सन कुनाला ही साजरा करता आला नाही मात्र या वर्षी दिवाळी सनानिमीत्ताने देशामधे प्रत्येक घराघरा मधे आणि प्रत्येकाच्या अंगनामधे साफसफाई ला सुरुवात झालेली असुन प्रत्येक झन साफसफाई करुन दिवाळी सनाची पुर्ण तय्यारी केलेली आहे मात्र एक दुर्दैवी लाजीरवाना धक्कादायक प्रकार समोर आला आहे सावळदबारा येथे श्री चक्रधरस्वामी यांच प्राचीन पवित्र मंदिर आहे हे मंदिर तीर्थक्षेत्र म्हनुण ओळखले जाते आणि दांडी पौर्णिमाला श्रीक्षेत्र चक्रधरस्वामी यांची मोठ्ठी यात्रा सालाबाद प्रमाणे दरवर्षी यात्रा भरत असते कोरोना महामारी मुळे या यात्रे वरती सुद्धा संकट आलेले होते आणि ही यात्रा रद्द झालेली होती मात्र अता वातावरण चांगले असल्यामुळे यात्रा दरवर्षी सालाबाद प्रमाणे यावर्षी ही मोठ्या प्रमानामधे श्रींची यात्रा भरनार आहे या यात्रेमधे अनेक गोरगरीबांच्या हाताला काम मिळत असतं परिसरातील छोटे मोठे दुकानदार दुकान लावत असतात आणि या यात्रेमधे लाखो रुपयांची ची उलाढाल व्यवहार होत असतो मात्र सावळदबारा ग्रामपंचायत तर्फे या उद्योग धंद्यांवाल्यांकडुन ग्रामपंचायत चा कर वसुली घेण्यासाठी वेळ आहे परंतु ज्या देवाच्या नावावरती ही यात्रा भरत असते आणि श्री चक्रधरस्वामी यांच्या दर्शनासाठी लाखो भाविक भक्त गन देशाच्या कान्याकोप-यातुन येतात आज त्याच देवाच्या प्रवेशद्वारा समोर पुर्णपणे घान कचरा मोठ्ठ्या प्रमानामधे ढीग लागलेला आहे

हे प्रवेशद्वारा ग्रामपंचायत अंतर्गत चौदा वित्त आयोग या योजनेमधुन बांधलेले असुन या प्रवेशद्वारा ला श्रीक्षेत्र चक्रधरस्वामी असे नाव दिलेले आहे आणि हे प्रवेशद्वार गावच्या पहिल्याच सुरवातीच्या रस्त्याला मुख्य रस्त्यामधे मोठमोठे खड्डे पडुन त्यामधे पाणी साचलेले आहे आणि चक्रधरस्वामी यांच्या या प्रवेशद्वारा समोर घान कच-यांच्या पर्वत रांगा लागलेल्या आहे दिवाळी सनामधे सुध्दा ग्रामपंचायत गावाची साफसफाई करु शकत नाही आज रोजी सावळदबारा गावामधे घानीचे साम्राज्य निर्माण झालेले असुन या कडे ग्रामपंचायत आणि ग्रामविकास अधीकारी हे जानुन बुजुन हेतु पुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे ग्रामपंचायत मधे जो निधी काम आलेले आहे ते काम करण्यासाठी ग्रामपंचायत कडे वेळ आहे परंतु दिवाळी सारख्या सनामधे सुध्दा गावाची साफसफाई करण्याचा ग्रामपंचायत ला विसर पडलेला आहे या घानीच्या अनेक वेळा बातम्या प्रकाशीत झालेल्या असुन ही मात्र वरिष्ठ अधीकारी यांच ही याकडे दुर्लक्ष असतं सध्या ला तर सावळदबारा ग्रामपंचायत चा पुर्ण कारभार स्वयंघोषीत झीरो सरपंच बघत आहे ग्रामपंचायत चे आलेले काम निधी कडे ग्रामपंचायत आणि स्वयंघोषीत झीरो सरपंच यांच लक्ष आहे परंतु गावाच्या साफसफाई कडे गावाच्या आणि गावक-यांच्या आरोग्याकडे मात्र पुर्णपणे दुर्लक्ष दिसुन येत आहे या अगोदर सुद्धा घाणीचे साम्राज्य च्या बातम्या प्रसारीत प्रकाशीत झाल्या होत्या आणि गावक-यांनी अनेक वेळेस सांगुन सांगुन शेवटी ग्रामपंचायत वरती आक्रोश मोर्चा काढला होता तरीही ग्रामपंचायत वरती कोनताही परीनाम झालेला नाही ग्रामविकास अधीकारी सतत गैरहजर आहे मुख्यालयास राहत नाही तरीही ग्रामपंचायत या ग्रामविकास अधीका-याला पाठीशी घालत आहे या अगोदर भ्रष्टाचारांच्या आणि घानीचे साम्राज्या च्या अनेक वेळेस बातम्या लागलेल्या आहे तरीही वरिष्ठ अधीकारी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देत नाही कोनतीही दखल घेत नाही कोनतीही चौकशी करत नाही त्यामुळे सावळदबारा ग्रामस्थांचे खुप हालच हाल होत आहे स्वयंघोषीत झीरो सरपंच हेच ग्रामपंचायत चा कारभार बघत आहे मात्र गावाच्या समश्यांकडे का दुर्लक्ष करीत आहे असा प्रश्न गावक-यांना पडलेला आहे अनेक वेळेस सावळदबारा ग्रामपंचायत चा मनमाणी कारभार आणि घानीचे साम्राज्य , झालेला भ्रष्टचार या विषयी अनेक वेळा बातम्या प्रसारीत झाल्या मात्र वरिष्ठ अधीकारी कोनतीही दखल घेत नाही साधी चौकशी सुद्धा करत नाही या मनमाणी ला कधी आळा बसेल वरिष्ठ अधीकारी दखल का घेत नाही वरिष्ठ अधीका-यांना ग्रामपंचायत चे पुढारी काही चिरीमीरी देऊन गप्प करत असल्याची चर्चा सध्या गावामधे ग्रामस्थांमधे सुरु आहे मुख्यालयास हजर न राहना-या आणि सतत गैरहजर राहना-या ग्रामविकास अधीका-याला वरिष्ठांचा आशिर्वाद असल्यामुळे या दांड्या बाहद्दर ग्रामविकास अधीका-यावरती कोनतीही कारवाई होत नाही कुठंतरी चिरीमीरी देत असल्यामुळे चौकशी होत नाही कोणती ही कारवाई होत नाही त्यामुळे गावक-यांमधे सध्या चर्चा रंगुलागलेली आहे वरिष्ठांना काहीतरी चिरीमीरी देऊन हा गैरप्रकार सुरु असल्याचे चर्चा सत्र गावामधे बोल्ले जात आहे श्री चक्रधरस्वामी यांच्या प्रवेशद्वारा समोर जो घान कचरा फेकला गेला आहे या कच-याकडे ग्रामपंचायत कधी लक्ष देनार गावक-यांच्या आरोग्याशी जो खेळखेळत आहे तो कधी थांबवनार या कच-याची कधी विल्हेवाट लावनार गावाच्या साफसफाई कडे कधी लक्ष देनार
असा प्रश्न सावळदबारा वाशियांना पडलेला आहे
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद