राज्यस्तरीय पेंशनर्स मेळावा व राज्यस्तरीय सेवा निवृत्त पुरस्कार वितरण ७जानेवारी,२०२३रोजी पैठण येथे आयोजित करण्यात आला असून राज्याचे रोजगार हमी मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री ना,संदीपान जी भुमरे यांच्या उपस्थितीत हा मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे असे औरंगाबाद जिल्हा पेंशनर्स चे अध्यक्ष वसंतराव सबनीस यांनी गुरुवार(ता,२८)रोजी बैठकीत औरंगाबाद येथे जाहीर केले, या बैठकीत तालुका शाखांचे अध्यक्ष सर्वश्री सदभावे,(गंगापूर), धोंडीरामसिंह राजपूत (वैजापूर) आबासाहेब बाविस्कर (सोयगाव) श्री,कुंभकर्ण(कन्नड) यांनी हा मेळावा यशस्वी करण्यास्तव सहकार्य करण्याचे आवाहन केले,

पैठणचे आर,ए,मोरे यांनी मेळाव्याचे नियोजन सादर केले,वसंत सबनीस यांनी सर्व पेंशनर्स यांनी तन, मन ,धनाने सहकार्याचे आवाहन केले,नामदेव घुगे यांनी सूत्र संचलन केले,तर जनार्दन अमृतकर यांनी आभार मानले,या प्रसंगी पेंशनर्स संघटनेच्या प्रमिला कुंभारे, रझवी सयद,श्री ,देशमुख व जिल्ह्यातील शाखांचे सदस्य उपस्थित होते. ललित काथवटे वैजापूर