औरंगाबाद : गंगापूर औरंगाबाद रोडवरील कोकम ॲग्रोजवळ कार व टाटा टेम्पोच्या समोरासमोर झालेल्या धडकेत चितेगाव ग्रामपंचायत सदस्य ठार टॅम्पोचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर औरंगाबाद रोडवरील कोकम ॲग्रोजवळ शनिवार २९ आक्टोंबर रोजी साडेतीन वाजेच्या सुमारास रमेश एवन त्रिभुवन ५० वर्ष राहणार चितेगाव तालुका पैठण हे एम एच ०२ झेड २२०७ या फोर्ड फिगो कारने मावशीला तानदुळवाडीला सोडून गंगापूर मार्ग चितेगावकडे जात असताना लिंबे जळगाव येथुन भुसा भरुन मुंबईकडे जात असणा-या टाटा टेम्पो क्रमांक एम एच ४८ बी एम २२५३ मध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत कारचा चक्काचूर झाला या धडकेत चितेगाव ग्रामपंचायत सदस्य रमेश त्रिभुवन हे गंभीर जखमी झाले होते.

त्यांना माजी नगरसेवक प्रदीप पाटील व त्यांच्या मित्रांनी कारचा दरवाजा तोडून बाहेर काढून स्वतःच्या गाडीतून गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत्य घोषित केले.याप्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये कार चालक अच्छेलाल यादव राहणार उत्तर प्रदेश हल्ली मुक्काम वसई मुंबई याच्या विरोधात निष्काळजीपणे गाडी चालवुन मरणास कारणीभूत ठरवुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पुढील तपास गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अमित पाटील हे करीत आहेत.