औरंगाबाद जातपडताळणी विभागाने बोगस आदिवासी लाभार्थ्यांना त्वरीत आळा घालुन त्यांना अ.जमातीचे कोनतेही जातीचे प्रमापत्र देऊनये या साठी आदिवासी संघटनांतर्फे देण्यात आले निवेदन
सध्याला औरंगाबाद जातपडताळणी विभागाकडे अनुसुचित जमातीचे प्रमापत्र मिळविण्यासाठी बोगस बिगर आदिवासी आणि दलाल मोठ्याप्रमानात धाव घेताना दिसत असुन या बोगस आदिवासी यांच्या बोगस प्रकाराला त्वरीत आळा घालुन हा बोगस प्रकार थांबविण्यात यावा या संदर्भामधे महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल्ल विकास परिषद या सामाजिक संघटनाने जातपडताळणी सह. आयुक्त तथा उपाध्यक्ष संगिता चव्हाण अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती औरंगाबाद यांच्याकडे निवेदन देण्यात आले

सध्याला बोगस बिगर आदिवासी घुसखोरी करुन अनुसूचीत जमातीचे प्रमापत्र मिळविण्यासाठी औरंगाबाद जातपडताळणी विभागाकडे दबाव तंत्र तय्यार करुन आदिवासी जातीचे प्रमापत्र घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे आणि यामुळे खरे गोरगरीब गरजु आदिवासी समाजाचे लाभार्थी वंचित राहत आहे तरी खरे गोरगरीब गरजु आदिवासी समाजाचे कोनतेही लाभार्थी वंचित राहु नये या साठी महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल्ल विकास परिषद चे प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी ,संघटनेचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष नजिर तडवी , प्रदेश सल्लागार समिर तडवी , सिल्लोड तालुका अध्यक्ष सलाउद्दिन तडवी यांनी औरंगाबाद सह. आयुक्त तथा उपाध्यक्ष जातपडताळणी समिती यांच्याकडे तक्रार निवेदन देण्यात आले जातपडताळणी विभागाकडुन खुप चांगले काम कार्य केले जात असुन बोगस बिगर आदिवासींना कोनताही थारा देण्यात येत नाही बोगस गिरी थांबवुन चांगले काम कार्य केल्याबद्दल जातपडताळणी समिती सह. आयुक्त संगिता चव्हाण यांच पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन सुध्दा करण्यात आले
बोगस बिगर आदिवासी यांना कोनतेही आदिवासी समाजाचे जात प्रमापत्र देण्यात येऊनये कुणी खुसखोरी करुन दबाव आन्न्याचा प्रयत्न केला तर संपुर्ण आदिवासी समाज आणी आदिवासी सामाजिक संघटना तुमच्या सोबत आहे असे प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी आणि संघटनेचे शिष्टमंडळ यांनी सांगीतले
प्रतिनिधी जब्बार तडवी औरंगाबाद