हिंगोली : गेल्या तिन वर्षापासुन हिंगोली जिल्ह्याभरात कधी अतीवृष्टी तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला असताना दुसरीकडे ऐन रबी हंगामातील पिकांना पाणी देण्याची वेळ अन अशातच शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विज पुरवठा खंडित केला जात असल्याने महावितरणाकडुन सुरू असलेल्या दडपशाहीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हत्यार उपसले असुन दि 30 नोव्हेंबर पासून गोरेगाव येथील महावितरण कंपनीच्या कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरू केले असुन या मध्ये अशी मागणी केली आहे शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपाचा विज पुरवठा तोडणे तात्काळ थांबवा,2010 पासुन कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ रोहित्र द्या,चुकीचे रिडीग देणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा, विद्युत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा,मंजुर झालेले 33 केव्ही जुन महिन्या पर्यंत सुरु करा अशा विविध मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गोरेगाव येथील विज वितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषन सुरू केले आहे या आंदोलनात नामदेव पंतगे गजानन प्रकाश कावरखे,याच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.