हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून मीनाक्षी पवार यांनी नुकताच पदभार स्वीकारला असुन त्यांनी अवैध सागवान तस्करी करणाऱ्यावर कारवाई करुन वचक निर्माण केली आहे त्यानुसार त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना तशा सूचनाही दिल्या असुन दि. 01 डिसेंबर रोजी वन परिमंडळ अधिकारी नर्सिंग तोलसरवाड हे त्यांच्या कार्यक्षेत्रात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गस्तीवर असताना त्यांना कळमनुरी येथून नांदेड कडे जाणारा नवीन बायपास रोडच्या कडेला सागवान लाकडे लपविले असल्याचे खात्रीलायक माहिती मिळाली. त्या ठिकाणी ते गेले असता बेवारस स्थितीत लपवून ठेवलेले सागवान गोल लाकडे आढळून आले. याची माहिती त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकारी मीनाक्षी पवार यांना दिली. त्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा पवार ह्या तात्काळ सदरील ठिकाण येवुन सागवान लाकडे जप्त करण्याच्या सूचना दिल्या.
असुन पुढील कार्यवाही कर्तव्यदक्ष वन परिमंडळ अधिकारी नर्सिंग तोलसरवाड यांनी केली आहे यावेळी जप्त केलेले सागवान लाकडे हे एक घनमीटर इतके असून ज्याची किंमत साधारणतः 22 हजार रुपये इतकी असल्याचे बोलले जात आहे सदरील कार्यवाही विभागीय वन अधिकारी बाळासाहेब कोळगे यांच्या मार्गदर्शना नुसार करण्यात आली असून या कार्यवाहीमध्ये हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार , वन परिमंडळ अधिकारी नर्सिंग तोलसरवाड, वनरक्षक दिपाली काशीदे,स्वप्निल शिरसागर आदींचा सहभाग होता. जप्त केलेली सागवान लाकडी येथील विभागीय वन परिसराच्या आवारात ठेवली असून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.तर हिंगोली जिल्ह्यात यापुढे अवैध वृक्षतोडी करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाणार असुन या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.