गोरेगाव येथे महावितरण कंपनीच्या संक्तीने शेतकरी संकटात.
सतत गेल्या तिन वर्षापासुन मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात कधी अतीवृष्टी तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू असुन हिंगोली जिल्हा हा आज ही मागासलेल्यात गिनला जात आहे कारण येथे उद्योग न जोडधंदा यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन कमी खर्च जास्त अशी परिस्थिती आहे.
या वर्षी सेनगाव तालुक्यात अतीवृष्टी होऊन शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली यामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.एकीकडे शेतकरी अडचणीत सापडला असताना दुसरीकडे मात्र विज वितरण कंपनीकडुन विजबीलाचे कारण पुढे करून शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपाचा विज पुरवठा खंडित केला जात आहे.
सोमवार रोजी चोंडी खुर्द येथील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विज पुरवठा खंडित केल्यामुळे चोंडी खुर्द येथे पाझर तलाव मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा असुन ही शेतकऱ्यांना शेतातील गहु,हरबरा,तुर,हळद या पिकांना पाणी देण्यासाठी विज पुरवठा खंडित केला असल्याने पिकं धोक्यात आले आहे.
विज वितरण कंपनीकडुन प्रत्येकी शेतकऱ्यांला पाच हजार रुपये सक्तिची विजबील भरना विज वितरण कंपनीकडुन केला जात आहे.विज वितरण कंपनीच्या मुजोर कारभाराविरोधात चोंडी खुर्द येथील शेतकरी आक्रमक झाले असुन दोन दिवसात विज पुरवठा सुरळीत केला नाही तर शेतकरी तिव्र आंदोलनांच्या पवित्र्यात आहे असा इशारा शेतकरी बद्रीनाथ पाटील यांनी दिला आहे.