section and everything up until
* * @package Newsup */?> आमदार प्रज्ञा सातव यांना जीवे मारण्याचा प्रयत्न | Ntv News Marathi

हिंगोली : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांची पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रज्ञा सातव यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली. माझ्यावर आज अत्यंत निर्घृणपणे हल्ला करण्यात आला. कळमनुरीच्या कसबे धवांडा येथे हा प्रकार घडला. मी दौऱ्यावर होते, त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने माझ्यावर पाठीमागून हल्ला केला. मला गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न होता. एका महिला आमदारावर हल्ला होणे हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. पाठीमागून भ्याड हल्ले करु नका, समोरुन येऊ लढा, असे प्रज्ञा सातव यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *