सहायक पोलिस निरीक्षक रवि हुंडेकर यांची उल्लेखनीय कामगिरी….

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या तात्कालीन सहायक पोलिस निरीक्षक श्रिदेवी पाटील यांच्या बदलीनंतर गोरेगाव पोलीस ठाण्याला लाभलेले सहायक पोलिस निरीक्षक रवि हुंडेकर यांनी गोरेगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून माहे जानेवारी 2023 या एका महिन्यात विवीध गुन्हेगारीचा छडा लावण्यासाठी विशेष कामगिरी बजावत गुन्हेगारांना आळा घालुन पोलीस खाकिचा धाक दाखवून गुन्हेगारी करणाऱ्यावर एक वचक निर्माण केली तसेच पोलीस ठाणे हद्दीतील गावागावात जातीय सलोखा कायम रहावा यासाठी शांतता बैठक घेऊन गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी त्यांना यश आले आहे जिल्ह्यातील एकुण तेरा पोलीस ठाण्याच्या कामगिरीमध्ये गोरेगाव पोलीस ठाण्याला प्रथम क्रमांक पटकावला असुन सहायक पोलिस निरीक्षक रवि हुंडेकर यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी मुळे प्रशिस्त पत्र देवुन गौरविण्यात आले आहे. जिल्ह्यातील तेरा पोलीस ठाण्याच्या तुलनेत गोरेगाव पोलीस ठाण्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.त्यामुळे दि 16 फेब्रुवारी रोजी गोरेगाव येथील नागरीकांकडुन सहायक पोलिस निरीक्षक रवि हुंडेकर यांचा सामुहिक सत्कार करण्यात आला यावेळी गोरेगाव येथील अॅड.गजानन कावरखे याच्यासह गोरेगाव येथील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *