हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातिल फेब्रुवारी मार्च 2023 अंतर्गत बारावी परीक्षांसाठी 33 परीक्षा केंद्रावर परीक्षा पार पडत असून आज मराठी विषयाच्या पेपरला भरारी पथकाने भेट दिली असता यातील ज्ञानेश्वर विद्यालय वरुड चक्रपान येथील दोन विद्यार्थ्यांना गैर मार्गाचा अवलंब करत असताना पथकाने कारवाई केली तसेच विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा या ठिकाणी पाच विद्यार्थ्यांना गैरमार्गाचा अवलंब करत असताना देखील कारवाई करण्यात आली तसेच प्राचार्य जि,शि, व,प्र, संस्था हिंगोली या पथकाने एका विद्यार्थ्यावर गैरमार्गाचा अवलंब करत असताना कारवाई केली व अमृतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय माळहिवरा ता ,जी, हिंगोली या परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्यावर शिक्षण अधिकारी या पथकाने गैरमार्गाचा अवलंब करत असताना कारवाई केली मराठी विषयासाठी जिल्ह्यात एकूण नऊ विद्यार्थी कारवाई झाली
प्रतिनिधी महादेव हरण हिंगोली