
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील जयमल्हार मित्र मंडळ आयोजित खंडोबा मंदीरात खंडोबा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी गावातुन खंडोबाची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी येळकोट, येळकोट च्या जयजयकाराने गोरेगाव नगरी दनाऊन गेली होती

या मिरवणुकीत गावातील सर्व धर्मांचे नागरीक महिलां उपस्थित होत्या खंडोबा मंदीरात दुपारी दोन वाजता खंडोबा लग्न सोहळा पार पडला यावेळी माजी महिला बालकल्याण सभापती रुपाली ताई राजेश भैय्या पाटील, राजवर्धन पाटील, अनिल पाटील, देवराव पाटील, गजानन पाटील, व्यापारी संजय पातळे,रमेश रवणे, तुळशीराम वैद्य, संतोष वैद्य, शारुख पटेल आणि जयमल्हार मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी गावातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.