आष्टी परिसरात आठवडाभरापासून दिवसा व सायंकाळच्या सुमारास वादळवारा सुटत आहे. वादळ-वारा सुटल्यानंतर लगेच वीज पुरवठा खंडित केला जाताे काय? मात्र केवळ मारकंडा कं व अन्य गावांकडे जाणारी वीज खंडित केली जाते काय?
याचवेळी परिसराच्या गावातील वीज पुरवठा सुरू असताे. अशा प्रकारचा दुजाभाव केला जात आहे काय? असा सवालही नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या सुमारास खंडित झालेला वीज पुरवठा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सुरळीत केला जात नाही. याचा त्रास गावातील नागरिकांना सहन करावा लागताे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन आष्टी केंद्रातील कर्मचाऱ्यांना निर्देश देऊन मारकंडा कं व अन्य गावांत नियमित वीज पुरवठा करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी मारकंडा कं येथील नागरिकांनी केली आहे.
भास्कर फरकडे
एन टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली