चामोर्शी तालूकयातील आष्टी पोलीस स्टेशन येथे आज दिनांक 24/08/2021 ला ठीक 12 वाजता पोलिस स्टेशन आष्टी येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला ग्रामपंचायत आष्टी चे प्रथम नागरिक सरपंच मॅडम बेबीताई बुरांडे यांनी पोलीस निरीक्षक मा. राठोर साहेबांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला तसेच सदर कार्यक्रमाला ठाकरी चे सरपंच कुळसंगे मॅडम, व पोलीस अधिकारी pi राठोड साहेब , psi कांबळे मॅडम ,psi जंगले साहेब व सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते वर्षाताई कलक्षपवार ,दारू मुक्ती संघटना महिला उपस्थित होत्या ,राजे धर्म राव शाळेतील मुलींनी प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्यांना राखी बांधून पोलीस आमची नेहमी बहिण प्रमाणे सेवा करीत असतात त्याकरीता पोलीसाना भावाचे प्रेम देणे आमचे कर्तव्य आहे असे सांगितले तसेच pi पोलीस निरीक्षक राठोर साहेबांनी महिलांना व शाळेतील मुलींना मार्गदर्शन केले तर आभार प्रदर्शन वर्षाताई कलक्षपवार यांनी केले कार्यक्रम व्यवस्थित पार पडला
भास्कर फरकडे
एन टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली