section and everything up until
* * @package Newsup */?> प्रतिबंधित प्लॉस्टिकचा वापर बाभूळगावकरांनी टाळावानगराध्यक्षा संगिता मालखुरे | Ntv News Marathi

शहर सौदर्यीकरण स्वच्छता मोहीम

जैवविघटन न होणाऱ्या वस्तुंचा वापर प्रचंड प्रमाणात वाढले आहे . उपयोगानंतर निर्माण झालेला कचरा पर्यावरणाला असंतुलीत करणारा असून जनजिवनावर याचे दुष्परिणाम होत आहे . यामुळे शासनाने एकल प्लॉस्टिक वापरावर बंदी घातली आहे . प्रतिबंधीत असलेले प्लॉस्टिकचा वापर बाभूळगाव शहरातील नागरिकांनी टाळावा . शहरात सुरू असलेले शहरसौदर्यीकरण स्वच्छता मोहीमेला हातभार लावावा असे आवाहन नगर पंचायतच्या नगराध्यक्षा संगिता मालखुरे यांनी केले आहे . काल बुधवारी ( ता .२१ ) रोजी नगरपंचायतच्या सभागृहात शहरातील प्रतिष्ठानाचे संचालक व नगर पंचायत प्रशासक यांची प्लॉस्टिक वापर बंदी संदर्भात समन्वय बैठक झाली . या बैठकीत नगराध्यक्ष बोलत होते .

यावेळी उपनगराध्यक्ष श्याम जगताप , माजी सरपंच डॉ . रिकबचंद तातेड , माजी उपसरपंच शब्बीर खान , सत्ताधारी पक्षाचे गटनेते जाकीर खान , विरोधीपक्ष गटनेते अनिकेत पोहोकार , नगरसेवक अहेमद शेख , मयुर पिसे , प्रदिप नांदुरकर यांच्यासह शहरातील व्यापारींची उपस्थिती होती . राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासुन ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत या कालावधीत महाराष्ट्र राज्यात नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेत शहरसौदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा राबविल्या जात आहे . या अनुषंगाने बाभूळगाव शहरात सुद्धा शहर सौदर्यीकरणाला सुरूवात करण्यात आलेली आहे . शहर स्वच्छतेसाठी व सुंदर बनविण्यासाठी स्थानिक नगर पंचायत शासनप्रशासनाने विशेष पुढाकार घेतला आहे . ३१ डिसेंबर पर्यंत शहरात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्या जात आहे . प्रतिबंधित प्लॉस्टिकचा वापर टाळण्यासाठी व्यापारीवर्गासोबत समन्वय साधण्यासाठी व त्यांचे सहकार्य मिळविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . बंदी असलेले प्लॉस्टिक संदर्भात सविस्तर माहीती नगर पंचायतचे समन्वयक स्फूर्ती गोडे यांनी दिली आहे . या बैठकीत व्यापारी कादर घाची , जुरावर खान पठान , महेश तातेड , धरमचंद तातेड , प्रा . दिनेश रोकडे , अशोक अमृतकर , शेख जावेद शेख रफिक , अंबादास जांभुळकर , धरमचंद छल्लाणी , सचिन लांजेवार , नंदकुमार कोल्हे , आरिफ खान पठान , अरशद खान पठान , शेख आमिर शेख कादर , महेश तातेड आदी प्रतिष्ठान संचालकांची उपस्थिती होती .

प्रतिनिधी सरफराज पठाण
Ntv न्यूज मराठी बाभुळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *