अस्मिता पाटीलची राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेसाठी निवड
सचिन बिद्री उस्मानाबाद :
उमरगा येथील अस्मिता अमोल पाटील या विद्यार्थिने नांदेड येथे झालेल्या ( दि .२६ ) शालेय लातूर ,उस्मानाबाद ,नांदेड जिल्ह्याच्या विभागीय ज्युदो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असून तीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे ,अंतर्गत व उपंचलानालय लातूर विभाग लातूर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु गोविंदसिंगजी स्टेडियम नांदेड येथे आयोजीत केलेल्या विभागिय शालेय ज्यूदो स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्याची उमरगा तालुक्यातील बलसुर येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची इयत्ता ११वी वर्गातील विद्यार्थीनी अस्मिता अमोल पाटील १९ वर्ष वयोगटातील ७० कीलो पुढील वजन गटात प्रथम आली असुन तीची निवड अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय ज्यूदो स्पर्धेसाठी झाली आहे . तीला प्रशिक्षक म्हणून प्रताप राठोड यांनी मार्गदर्शन केले आहे .
तिच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा शैलजाताई मगर, सचिव प्रा सुरेश बिराजदार, जिल्हा ज्युदो सचिव प्रवीण गडदे,संचालक गोविंदराव साळुंखे, दत्तात्रय बिराजदार ,तालुका क्रीडा संयोजक संजय सोलंकर ,मुख्याध्यापक श्रीपाद कुलकर्णी,क्रीडा शिक्षक मालाजी काळे , उपमुख्याध्यापक नाना कुसुमडे आदींनी या यशाबद्दल अभीनंदन करूण शुभेच्छा दिल्या आहेत .