नगर परिषद व पोलीस प्रशासन यांची जय्यत तयारी
लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मैलारपूर इथल्या श्री खंडोबाच्या वार्षिक यात्रा महोत्सव, विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन…
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मैलारपूर (नळदुर्ग ) इथल्या श्री खंडोबाच्या वार्षिक यात्रा महोत्सवास 5 -7 जानेवारी ( गुरुवारी ) रोजी सुरुवात होत आहे. या यात्रोत्सवादरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं असून यात्रेची जय्यत पूर्वतयारी सुरू आहे. या महायात्रेस किमान 7 लाख भाविक हजेरी लावतील, असा अंदाज पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे व्यक्त केला जात आहे.
येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन व्यवस्थित व्हावं यासाठी नळदृग नगर परिषद व पोलीस प्रशासन मंदिर समिती यांच्या वतीने योग्य ते निवेदन भक्तांसाठी करण्यात आले आहे.
यावेळेस पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरिता एकेरी मार्ग सुरू करण्यात आले आहे.
जाण्यासाठी आणि येण्यासाठी वेगवेगळे मार्ग असल्याने वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.
त्याचबरोबर या ठिकाणी दर्शन व्यवस्था. आरोग्यसेवा. अग्निशामक दल. भक्तांच्या सुरक्षा साठी पोलीस प्रशासन अनेक तैनात करण्यात आले आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी दिली.