उस्मानाबाद तालक्यातील टाकळी (बे) ग्रामपंचायत वर भारतीय जनता पार्टी जिल्हाचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली आहे. बिनविरोध उपसरपंच पदी दत्ताभाऊ सोनटक्के यांची निवड करण्यात आली.
गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविल्याने भरघोस मतांनी सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले मागील काळात झालेला गावाचा विकासामुळे राहुल शिवाजी मसाळ हे भरघोस मतांनी निवडून आले.
उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच राहुल मसाळ यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक निर्णय अधिकारी केदार दुधांबे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक घंटे , यांच्या उपस्थितीत पारदर्शकपणे पार पडली. उपसरपंच पदाची निवडीसाठी दत्ताभाऊ सोनटक्के यांचे एकच फॉर्म आल्याने उपसरपंच पदाची बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य पीरसाब शेख, वर्धमान शिरगिरे , मंगल महादेव सूर्यवंशी , पूजा ज्योतीराम जाधव, शोभा विजयकुमार नरवडे , मोहिनी प्रशांत सोनटक्के, फरहाणा उमरखा पठाण, यांच्यासह इतर सदस्य यावेळी उपस्थित होते .
मागील काळामध्ये मोठ्या प्रमाणात गावाच्या विकासासाठी विविध योजनेच्या माध्यमातून कामे करण्यात आली तसेच इतर अनेक विकासाच्या योजना मंजूर करून घेण्यात आल्या व त्याची कामे सुरू आहेत तर येणाऱ्या काळात गावाच्या विकासासाठी नियोजनबद्ध उपक्रम राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन व अटल भुजल योजनेच्या माध्यामातून गावात पाणी पुरवठ्याच्या अनेक कामे सुरू आहेत. विविध विकास कामे होणार असून जुना केंद्र शासनाच्या योजना च्या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत त्याच विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून विजय मिळवला आहे असे मत उपसरपंच दत्ताभाऊ सोनटक्के यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी निवडून आलेल्या सर्व सदस्यांचा गावकऱ्यांच्या वतीने व प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.