सचिन बिद्री:उस्मानाबाद
उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या विरोधात राज्य सरकारच्या निषेधार्थ प्रभारी तहसीलदार श्री काजळे यांना दि २२ रोजी निवेदन देण्यात आले .
देण्यात आलेल्या निवेदनात , आज दि २२ रोजी सभागृहामध्ये जनतेच्या हिताच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरणाऱ्या संयमशील व शांत आ . जयंत पाटील यांना निलंबीत करण्यात आले आहे . सध्याचे सरकार जनतेची प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक विरोधकाला खोटया केसेस करून व विविध अन्य प्रकारे अडचणीत आणण्याचे काम सुरू केले आहे जे लोकशाहीस धोकादायक आहे. जनतेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरणे हा विरोधी बाकावरच्या लोकप्रतिनिधींचा अधिकार आहे . पण हे सरकार हुकुमशहा प्रमाणे सुडबुद्धीने वागत आहे जे चुकीचे आहे , बेकायदेशीर आहे. आजचे आ . जयंत पाटील यांचे निलंबन सुद्धा बेकायदेशीर आहे. सदर निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावे अन्यथा उमरगा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलने करण्यात येतील, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार हे राज्य सरकार असेल. असा निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे .
निवेदनावर डॉक्टर सेलचे शहराध्यक्ष डॉ .फरीद अत्तार, सरचिटणीस धीरज बेळंबकर, तालुका उपाध्यक्ष भैया शेख, विद्यार्थी प्रदेश सचिव अजित पाटील, शहराध्यक्ष खाजा मुजावर ,युवक शहराध्यक्ष सुशील दळगडे, अल्पसंख्यांक अध्यक्ष हाजी सय्यद ,कार्याध्यक्ष फैयाज पठाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते .