
माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू भाऊ कडू यांनी दि 10 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना विनाअट
शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत आदेश निर्गमित करण्याची विनंती केली आहे.
या पत्रात दोन संदर्भाचा समावेश करीत,शासन परिपत्रक क्र. पअक-१००१/प्र.क्र६८/२००२/१६-अ
दि. ३०/९/२००२ आणि मा.जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांचे पत्रक क्र. महा/ २ /आस्था/१-अशक/कावी-२४०३/०६ दि.१८/१/२००६ या दोन संदर्भाचा समावेश कारण्यात आला आहे.
पत्रात नमूद करण्यात आले आहे की,परिपत्रक असूनही गेल्या २५ वर्षापासून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. महाराष्ट्र राज्यातील
पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांनी विनाअट शासकीय सेवेत सामावून घेणे बाबत विनंती केलेली आहे.तरी पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या मागणीचा जाणीवपूर्वक विचार करून महाराष्ट्र राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना विनाअट शासकीय सेवेत सामावून
घेणे बाबत आपल्या स्तरावरून संबंधीतांना आदेश निर्गमित करावेत,अशी नम्र विनंती करण्यात आली आहे.
