उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने “राष्ट्रीय बेंच प्रेस अजिंक्य पद स्पर्धा ” दिनांक १६ जानेवारी २०२३ ते२०/१/२०२३या कालावधीत “विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा-परिसर, औरंगाबाद (संभाजीनगर) ” या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.
असे महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन चे सरचिटणीस,शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त,आंतरराष्ट्रीय पंच संजय सरदेसाई यांनी सांगितले.
या स्पर्धेत संपूर्ण देशातून १५००पेक्षा जास्त खेळाडू व २०० प्रशिक्षक व व्यवस्थापक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत सब – ज्युनिअर,ज्युनिअर, सिनिअर,आणि मास्टर(४०/५०/६०/७०) वर्षांवरील नामवंत पुरुष व महिला खेळाडू सहभागी होत आहेत. महाराष्ट्र राज्य संघातून १८०खेळाडू आपला सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य संघाचे प्रशिक्षक म्हणून देवदत्त भोईर(ठाणे),डेव्हिड मकासरे(अहमदनगर), अमोल साठे(सातारा)आणि क्षीरसागर सर(परभणी)हे काम पाहतील.तसेच महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक म्हणुन संजय निकम(जळगाव)आणि अरुण पाटकर (रायगड)हे काम पाहतील.
या राष्ट्रीय स्पर्धेसाठी अनेक मान्यवर पंच येणार असुन अनेक जणांनी स्पर्धेसाठी साह्य केले आहे व औरंगाबाद जिल्हा संघटनेचे सहकार्य होणार आहे.

सचिन बिद्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *