वाशीम:- आगामी काळात मकर संक्रांतीचा सण असून त्यावेळी सर्वत्र पतंग उडविण्यात येतात. पतंग उडविण्यासाठी नायलॉन/चायनीज मांजाच्या वापरामुळे पशु, पक्षी तसेच मनुष्यास हानी तसेच जीवित हानीचे प्रकार घडलेले आपणास पहावयास मिळतात. त्यानुषंगाने शासनाने पतंगाकरिता चायनीज/नायलॉन मांजा साठवणूक, विक्री व वापर करण्यावर प्रतिबंध घातला आहे.
या पार्श्वभूमीवर मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व शाखा प्रमुखांना चायनीज/नायलॉन मांजाची साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात आदेशित केले होते. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी वेगवेगळे पथक स्थापन करून चायनीज/नायलॉन मांजाची साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर कारवाया केल्या. पोलीस स्टेशन वाशिम शहर हद्दीतील जुन्या नगर परिषद जवळील एका दुकानातून नायलॉन मांजाचे २ किलो वजनाचे एकूण ८ बंडल अंदाजे किंमत २०००/-रु. जप्त केले व संबंधित आरोपीविरुद्ध पो.स्टे.वाशिम शहर येथे अप.क्र.२१/२३, कलम ५ पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच पो.स्टे.मंगरूळपीर हद्दीतील दत्त मंदिराजवळील दुकानातून ३ किलो वजनाचे ५ बंडल अंदाजे किंमत २५००/-रु. व पठाणपुरा, मंगरूळपीर येथील एका दुकानातून १.५ किलो वजनाचे ३ बंडल अंदाजे किंमत १५००/-रु. तसेच पो.स्टे.मंगरूळपीरच्या पथकाने व्हिडीओ चौक, मंगरूळपीर येथील एका जनरल स्टोअर मधून नायलॉन मांजाचे ०२ रील अंदाजे किंमत ५००/-रु. असा एकूण ४५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पो.स्टे.मंगरूळपीर येथे संबंधित आरोपीविरुद्ध अनुक्रमे अप.क्र.२३/२३, अप.क्र.२२/२३ व अप.क्र.२४/२३, कलम ५ पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अश्याप्रकारे एकूण ०४ प्रकरणांमध्ये ०४ आरोपींविरुद्ध प्रतिबंधित चायनीज/नायलॉन मांजा विक्रीकरिता साठवून ठेवल्याप्रकरणी कारवाई करत एकूण ६५००/-रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे पथक पोहवा.दिपक सोनवणे, सुनील पवार, पोना.प्रवीण राऊत, प्रशांत राजगुरू, राजेश राठोड, पोकॉ.संतोष शेनकुडे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी पार पाडली.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *