सचिन बिद्री:उस्मानाबाद
उमरगा शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये 1990 च्या दहावी बॅचतर्फे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे तर प्रमुख उपस्थिती शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे,शिक्षणतज्ञ सदानंद शिवदे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
तब्बल 32 वर्षानंतर सर्व वर्गमित्र मैत्रिणी एकत्र आल्याने या स्नेहमेळाव्याला वेगळेच महत्व प्राप्त झाले होते. सर्व वर्गमित्र-मैत्रिणी एकमेकांना भेटण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तर आलेच होते परंतु काही मित्र परदेशातूनही आवर्जून उपस्थिती लावली होती.उत्तम नियोजन,आकर्षक रांगोळी,फुग्यांची सजावट आणि मुलींचे झांज पथक यामुळे कार्यक्रमात आनंदाला उधाण आले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होते. विशेष म्हणजे बहुतेक सर्वच मित्र-मैत्रिणी या कार्यक्रमासाठी आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे,सरिता उपासे, सोनाली मुसळे,संजय रूपाजी व बशीर शेख यांनी सर्व गुरुजनांचे व विद्यार्थ्यांचे झांज पथकाच्या तालावर मोठ्या उत्साहात वाजत गाजत मिरवणुकीने गुरुजींना आणि विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक आणले.या बॅचला शिकवलेले शिक्षक धोंडीराम लोखंडे, भगवान पुरी, बलभीम पाचंगे ,एस.बी. कांबळे भालचंद्र पोतदार, प्रभावती जाधव, मंदा पोतदार,इंदुबाई पोतदार ,चंनबसप्पा चौगुले, विठ्ठलराव माने, उज्वला अहंकारी या सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मानपूर्वक यावेळी सत्कार करण्यात आला .
शाळेच्या रंगरंगोटीसाठी 51 हजार रुपयाची निधी माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भेट स्वरूपात दिली तर या शाळेच्या कायमस्वरूपी आठवणी राहण्यासाठी दरवर्षी शाळेतून प्रथम येणाऱ्या मुलाला व मुलीला एक हजार एकशे अकरा रुपयांचे बक्षीस कायमस्वरूपी देण्याचे घोषित केले.पंधरा दिवसापासून झालेली तयारी आणि त्यासाठी प्रयत्न करणारे वर्गमित्र मंगेश देशमुख, समिंदर कटके, दत्ता सोनकवडे, नितीन जगदाळे, प्रकाश अंकलकोटे,रवी दंडे, दिगंबर रोंगे, विजय धोत्रेकर, महेश पुरंत ,डॉ. बळवंत माने, नागेश दंडगे ,नंदा झोंबाडे, छाया विश्वकर्मा, सुनंदा गोस्वामी, सुनीता गायकवाड, अर्चना चव्हाण ,वंदना सूर्यवंशी, यांच्यासह मोठ्या संख्येने वर्गमित्र मैत्रिणी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश टोपगे, प्रास्ताविक समिंदर कटके आणि आभार सलीम विजापुरे यांनी मांनले.स्नेहमेळाव्यात गाण्यांच्या भेंड्या.स्नेहभोजन,विविध शाळेतील खेळ खेळून जून्या आठवणींना उजाळा देण्यात आला एकंदरीत मोठ्या उत्साहात हा स्नेहमेळावा संपन्न झाला.