सचिन बिद्री:उस्मानाबाद

शिक्षक मतदारसंघाची निवडणूक म्हणजे सुज्ञ शिक्षक वर्गातून निवडून दिलेला सुजाण आमदार असे म्हणावे लागेल. म्हणून आपल्या सर्वांचा हक्काचा माणूस. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक संस्थाचालक या सर्वांच्या प्रश्नांची जाणीव असणारा आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारा उमेदवार विक्रम काळे यांना खरगोश मतांनी विजयी करावे आणि पुन्हा एकदा विक्रम करावा असे प्रतिपादन मराठवाडा पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांनी केले.
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.विक्रमजी काळे यांच्या प्रचारार्थउमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात शिक्षक, प्राध्यापक मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपस्थित शिक्षक मतदारांशी आमदार सतीश चव्हाण यांनी संवाद साधला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील,भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे,उपाध्यक्ष अश्लेष मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबा पाटील,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे,सुधाकर पाटील, संस्थेचे सरचिटणीस जनार्दन साठे, सचिव पद्माकरराव हराळकर, संचालक डॉ.विजय पाटील,विठ्ठल नरसाळे, तानाजी फुकटे, दिगंबर बिराजदार,शेषराव पवार, रामराव इंगोले,त्र्यंबकराव इंगोले,अशोकराव पाटील,प्रदीप चालुक्य,प्राचार्य दिलीप गरुड, प्रा. एच.एन.रोडे, प्रा.डी.आर.कुलकर्णी, प्रा.घनश्याम जाधव सर्व शाखांचे प्रमुख, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय अस्वले तर प्रास्ताविक शौकत पटेल आणि आभार प्रदर्शन संजय ढोणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *