आडगाव मार्गाहुन शिवण्याकडे अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या हाईवा अजिंठा-बुलढाणा महार्गाला लागताच. शिवना येथील हॉटेल राजवीर याठिकाणी स्थानिक महसूल विभागाचे तलाठी भगतसिंग पाटील यांनी धाड टाकून हाईवा गाडी पकडली. व त्याठिकाणी चालक आणि महसूल विभागाचे अधिकारी त्यांच्यात चर्चा झाली. आणि त्यानंतर शिवना येथील जाधव वाडी याठिकाणी अवैध मुरूम वाहतूक करणारा हाईवा गाडी आणली.

आणि त्याठिकाणी परंत हाईवा चालक आणि महसूल विभागाचे अधिकारी यांनी चर्चा केली. व काही मिनिटात अवैध मुरूम वाहतूक करणारा हाईवा गाडी अजिंठा-बुलढाणा महामार्गा लागत खाली केल्याचा प्रकार पाच वाजेच्या सुमारास घडला आहे. हाईवा गाडी अवैध मुरूम खाली करून शिवना आन्वा रस्त्याने सुसाट झाली. व महसुल विभागचे अधिकारी अजिंठा गावाकडे रावना झाले. कुठलेही कागतपत्र न बघता कारवाई न करता हाईवा गाडी खाली करून सोडून का दिली.यामागचे गौडबंगाल काय? असा सवाल नागरिकांन मध्ये उपस्थित होत आहे. का यामध्ये काही तोडीपाणी झाली अशी चर्चा सुज्ञ नागरिकांन मध्ये होत आहे.

मला आदेशीत झाले म्हणून गाडी सोडली..
शिवना गावाचे स्थानिक महसूल विभागाचे तलाठी भगतसिंग पाटील यांनी बोलताना असे सांगितले की. त्यांचे रॉयल्टी कागतपत्र असेल व मला माझ्या वरीष्ठ अधुकऱ्यांकडून आदेशीत झाली की ती गाडी सोडून देण्यात यावी. म्हणून मी ती हाईवा गाडी सोडून दिली आहे.
भगतसिंग पाटील :- तलाठी सजा कार्यालय शिवना
सिल्लोड प्रतिनिधि मुजीब शेख